आष्टी (प्रतिनिधी)
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेचा 'सहकार महर्षी बापूराव देशमुख' हा पुरस्कार डॉ.भास्कर बडे यांच्या " बाईच्या दगड " या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.पुरस्कार समितीमचे संयोजक प्रा.डॉ.राजेंद्र मुंडे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे सांगितले आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा मार्च २०२५ मध्ये होणार आहे.या कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे असेही त्यांनी सांगितले.पुरस्काराचे स्वरूप याप्रमाणे आहे.रोख पाच हजार रुपये,शाल,श्रीफळ व मानपत्र ,भव्य कार्यक्रमात दिले जाणार आहे."बाईचा दगड" हा कथासंग्रह चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे.या कथासंग्रहाला आजपर्यंत विविध असे राज्य पातळीवरचे १२ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ.भास्कर बडे यांचे,विविध स्तरातून मित्रमंडळीकडून प्राध्यापक,
शिक्षक यांच्याकडुन अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या