Ticker

6/recent/ticker-posts

जिद्दीने अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे ........... प्रशासन अधिकारी माऊली बोडखे

आष्टी (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करावे.आपले आई वडीलांचे शाळेचे व गावचे नाव उज्ज्वल करा.कानिफनाथ विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता मागिल काही वर्षांपासून चांगली राहिली आहे.तीच परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे.शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आणण्यासाठी जबाबदारी तुमच्यावर आहे.सर्वांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे.जिद्दीने अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे असे प्रतिपादन प्रशासन अधिकारी माऊली बोडखे यांनी केले. आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील कानिफनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी माऊली बोडखे हे होते.दि.१८ फेब्रुवारी रोजी कानिफनाथ विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी जय भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक भीमराव आहेर,कानिफनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय सायकड अध्यक्षस्थानी होते. पुढे बोलताना माऊली बोडखे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासावर भर देऊन चांगला अभ्यास करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या तसेच जय भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक भीमराव आहेर,मुख्याध्यापक दत्तात्रय सायकड यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात अभ्यासाचे तंत्र कसे वापरावे कोणत्याही विषयाचा पेपर हा पूर्ण करण्यावर भर द्यावा. पेपर लिहताना कोणती काळजी घ्यावी,याविषयी मार्गदर्शन केले, याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक गाडे तर आभार एस.पी.गाडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या