
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील जामगावचे सरपंच राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीत शुक्रवारी पंचायत समितीच्या प्रांगणात महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचा खेळ पैठणीचा या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या विविध खेळांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक कडा येथील शुभांगी देवकरने पटकावला मानाची पैठणी, फ्रीज,सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप होते. प्रामुख्याने मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गांची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.युवा नेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने महिला भगिनींसाठी खास सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या राज्यभर गाजत असलेल्या होम मिनिस्टर ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी महिलांनी तळ्यात मळ्यात,उखाणे
,फुगा फोडणे,फॅशन शो यासह अनेक गीतांवर ठेका धरत स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला.
अभूतपूर्व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल हजारोच्या संख्येने आलेल्या महिलांनी युवा नेते राधेश्याम धस यांचे विशेष आभार मानले. आकर्षक बक्षिसांची लयलूट यावेळी पहायला मिळाली. ज्यामध्ये प्रथम पारितोषिक म्हणून घरगुती वापराचे फ्रीज द्वितीय पारितोषिक एल.इ.डी. टीव्ही,तृतीय पारितोषिक कुलर,चतुर्थ पारितोषिक वॉटर फिल्टर,पाचवे पारितोषिक मिक्सर होते.ज्यामध्ये अनुक्रमे प्रथम येण्याचा मान कडा येथील शुभांगी गणेश देवकर यांनी द्वितीय शितल सतीश भोसले, तृतीय काजल भाऊसाहेब भोजने, चतुर्थ रोहिणी दिलीप जगताप तर पाचवे पारितोषिक जया परमेश्वर वारंगुळे यांनी पटकावले. यामध्ये सहभागी झालेल्या ३०० महिलांना आकर्षक स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या तर अनुक्रमे विजेत्या महिलांसह इतर १० महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले.
चौकट
---------
युवानेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
0 टिप्पण्या