Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी अरुणभैय्या निकाळजे, बाळासाहेब घोडके यांची अविरोध निवड

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी नगरपंचायतमधील दोन नामनिर्देशित सदस्यांच्या (स्विकृत नगरसेवक) झालेल्या रिक्त जागी दोन सदस्यांची आज निवड झाली.
आज शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी सकाळी ११ वा.आष्टी नगरपंचायत येथे यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.आष्टी नगरपंचायतच्या नामनिर्देशित स्वीकृत सदस्यपदासाठी दोन रिक्त झालेल्या जागेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली दोन्हीही खंदे समर्थक असलेले रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नेते अरुणभैय्या निकाळजे आणि बाळासाहेब घोडके यांची स्वीकृत नगरसेवकपदी अविरोध निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांचे उपविभागीय अधिकारी,नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक,ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. आष्टी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नामनिर्देशित स्वीकृत सदस्यपदी अस्लम बेग आणि श्रीमती अनिता गर्जे यांची निवड झाली होती.या दोन्ही सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या दोन्ही नामनिर्देशित सदस्यांच्या जागी दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय,बीड नगरपरिषद प्रशासन विभागाने याबाबत आष्टी नगरपंचायत येथे विशेष सभेचे आयोजन केले होते.या विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी पाटोदा,श्रीमती नसिमा शेख यांना प्राधिकृत करण्यात आले असून बाळदत्त मोरे प्रभारी मुख्याधिकारी नगरपंचायत आष्टी हे साहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहिले.यावेळी गणेश शिंदे,रामशेठ मधुरकर,सादीक कुरेशी, नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे, किशोरमामा झरेकर,शरीफ शेख,सुनिल रेडेकर,ज्ञानदेव राऊत,अक्षय धोंडे,वाल्हेकर,अशोक निकाळजे,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,प्रविण पोकळे,शरद रेडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. -------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या