आष्टी (प्रतिनिधी)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आष्टी ग्रामीण रुग्णालयात दि.१८ डिसेंबर रोजी टंगटाय (Tongue tie) शत्राक्रिया शिबीर झाले.हे शिबीर हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शहाणे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेख रौफ, आरसीएचचे अधिकारी डाॕ.शेकडे ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल.आर.तांदळे, वैधकिय अधीक्षक डॉ.राहूल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तांदळे,आर.के.तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर झाले.या शिबीरासाठी ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथील वैद्यकीय अधीक्षक तथा जनरल सर्जन डॉ. अभिषेक जाधव यांनी ३० बालकांवर टंगटाय इतर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.या कॅम्पसाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.बालाजी गुट्टे,डॉ.सुरेश ढाकणे, घोडके सिस्टर,शेख बी. सिस्टर,बनकर सिस्टर,बोडखे मामा,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या