Ticker

6/recent/ticker-posts

सौरभ जाधव सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील राघापूर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेला सौरभ सतीश जाधव हा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सनदी लेखपाल परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सौरभने आपल्या जिद्द,मेहनत, आणि चिकाटीच्या जोरावर हे कठीण आव्हान पेलले आहे. सौरभ जाधव यांनी अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत दोन्ही ग्रुप यशस्वीरीत्या पास केले.अत्यंत गरीब परिस्थितीतुन शिक्षण घेतलेल्या सौरभने आपल्या मेहनतीने आणि कष्टाने कुटुंबाचे, गावाचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या यशामुळे पंचक्रोशीतील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सौरभचा आष्टीत सत्कार सोहळा झाला.सौरभचे वडील सतिश जाधव,समाजसेवक अशोक पोकळे, सिध्दीविनायक उद्योग समूहाचे मालक रमेश भोगाडे,डॉ.सखाराम वाढरे,डॉ.रवी सातभाई, सिताराम हंबर्डे,योगेश बोराडे,आकाश भोगाडे, उद्धव भोगाडे,सुशिल हंबर्ड यांनी त्याचा सन्मान केला.यावेळी अशोक पोकळे म्हणाले की,सौरभचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.त्याने केवळ आपल्या कुटुंबाचे नाही तर संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. यावेळी सौरभ जाधव म्हणाले की,माझ्या यशाचे श्रेय आई- वडिलांच्या त्यागाला आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न साकार करण्यासाठी कष्ट आणि चिकाटीची गरज असते.सौरभचा प्रवास ‘शून्यातून शिखराकडे’ जाण्याचा आदर्श ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे पंचक्रोशीतील तरुणांना एक नवी दिशा मिळाली आहे.सामान्य परिस्थितीतही मोठे यश मिळवता येते.हे सौरभने सिद्ध करून दाखवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या