Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरीच खरा श्रीमंत आहे कारण तो आई वडीलांना वृध्दाश्रमात पाठवत नाही ......... ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल

उत्तम बोडखे,संतनगर कडा. -------------------- सध्याच्या धकाधकीच्या काळात स्वतंत्र्याच्या नावाखाली स्वराज्य सुरू असून केवळ शिक्षण घेतल्यामुळे सुशिक्षित मिळवणारे स्वतःच्या सुखासाठी आपल्या जन्मदात्या वयोवृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकारी यांच्यापेक्षा दुष्काळात निसर्गाशी झगडून देखील कष्ट करणारा शेतकरी वर्ग आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाही.
शेतकरीच खरा श्रीमंत आहे कारण तो आई वडीलांना वृध्दाश्रमात पाठवत नाही असे प्रतिपादन संत मदन महाराज बिहाणी देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले. कडा येथील संतनगरात संत मदन महाराज बिहाणी यांंच्या २८ व्या. पुण्यतिथीनिमित्त बबन महाराज यांची श्रीराम कथा,अखंड हरिनाम सप्ताह झाला.या सप्ताहातील काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर जयदत्त धस,महेबुब शेख,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,हनुमानशेठ बिहाणी (बीड),मारुती वनवे (मुंबई),राष्ट्रवादीचे नेते आण्णासाहेब चौधरी, सरपंच भीमराव पाटील,शंकर देशमुख, माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,माजी सभापती युवराज पटील, सुनिल नाथ, निवृत्तीदादा बोडखे महाराज,संजय गाढवे,निळकंठ महाराज तावरे,संतोष महाराज मोरे,बाबुराव पाटील सुर्यवंशी, मोहन महाराज आमटे महाराज,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,पत्रकार उत्तम बोडखे,रघुनाथ कर्डीले,दिगांबर बोडखे शरद गर्जे,बाबासाहेब मुळीक,सुभाष मामा सोनवणे,माजी सरपंच रामशेठ मधुरकर,भाऊसाहेब गाडे,पी.ई.तळेकर आप्पा,गोरख कर्डीले,प्रा.डाॕ.शाम सांगळे,उध्दव कर्डीले,बाळासाहेब कर्डीले,सुभाष कर्डीले,डाॕ.मनोज पाचे,नवनाथ तांदळे,तुकाराम भोसले,भाऊसाहेब भोजने,बंडु शिंदे, नवनाथ साबळे,अनिकेत चांगुणे महाराज,ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे, ह.भ.प.पंढरीनाथ भालके महाराज,ह.भ.प.मोहन महाराज आमटे, रविंद्र महाराज तवले,ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,ह.भ.प.हौसराव मगर महाराज,ह.भ.प.संतोष महाराज मोरे,अशोक बळे,परकाळे,बाळसाहेब कर्डीले,सुनिल देशमुख,सदानंद जोशी,पांडुतात्या झिंजुर्के,विक्रम पोकळे, पांडुरंग कर्डीले,सुभाष महाराज थोरवे,सुदाम झिंजुर्के,गजुकाका कुलकर्णी,नवनाथ तांदळे,संपतदादा सांगळे,संजय ढोबळे, रतिलाल कटारिया,लक्ष्मण नन्नवरे,डाॕ.शिवदास खिलारे,योगेश कापरे, महेश बहिरवाल आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक, शिक्षण,व्यापार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल पुढे म्हणाले की,संत हेच समाजाचे सर्वश्रेष्ठ गुरु असतात.संत हे देव आणि समाजामध्ये दुवा निर्माण करतात.संत मदन महाराज बिहाणी यांनी निरलसपणे मार्गदर्शन करताना स्वतः उघडे राहुन समाजाला मायेची,भक्तीची ऊब दिली.त्यांनी स्वतः लग्न केले नाही पण हजारो लग्न लावून दिले,ते स्वतः उपाशी राहीले पण वसतिगृह सुरू करुन अनाथ मुलांना घास भरवला,त्यांनी देहाची पर्वा न करता परमार्थ केला. संत मदन महाराज बिहाणी यांंच्या अलौकिक सेवाकार्यामुळे चंद्र-सुर्य असेपर्यत समाज त्यांना विसरणार नाही असे सांगत मुले असावेत तर ते चांगली मुले आहेत असे म्हणण्याच्या लायकीचे असावेत. अन्यथा मुले नसले तरी चालतील अशी परिस्थिती आहे आपल्याला प्रभू रामचंद्र सारखे दैवत हे अत्यंत आदर्श असून सावत्र आईच्या आदेशावरून आनंदाने वनवासात गेले आहेत.प्रभू श्री रामचंद्र हे मातेच्या आज्ञेनुसार वनवासात गेले आहेत परंतु आज त्यांच्याच भूमीमध्ये भारत देशामध्ये वृध्दाश्रम उभारले जात आहेत. वृध्दाश्रम सुरु करावे लागणे हे हिंदुस्थान देशासाठी भुषण नसून दूषण आहे त्यामध्ये आणखी दुःखद बाब अशी आहे की या वृद्धाश्रमामध्ये सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचेच आई वडील यांना ठेवले जात आहे आहेत मात्र सतत दुष्काळाच्या छायेत असून देखील काळ्यामातीत राबणा-या शेतकऱ्यांचे माता पिता वृध्दाश्रमात पाठवले जात नाहीत.हे तपासून पाहा त्यामुळे शेतकरीच खरे श्रीमंत आहेत आहेत असे सांगत ज्या घरातील वयोवृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात जात आहेत त्यांची मुले आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीचे संस्कार करणार आहेत कदाचित अशा प्रकारचे संस्कार कमी पडल्यास त्यांची मुले आपल्या आई वडील यांना वृद्धापकाळ मध्ये वृद्धाश्रमात पाठविण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारे धोका ओळखून समाजातील सुशिक्षित मिळवणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या आई-वडिलांना वृध्दाश्रमात पाठवू नये.उलट परमेश्वरा इतकीच सेवा आपल्या आई-वडिलांची करावी याबाबत अत्यंत परिणामकारक आणि सुंदर असे समाज व्यवस्थेचे वर्णन करताना ते पुढे म्हणाले की,संसारातील गोष्टींनी कोणाचीही तृप्ती होत नसते संसार सुखाचे मागे जाऊनही मानव अखेर अतृप्तच राहत असतो आपण श्रीकृष्णाच्या चरित्राचे उच्चारण करतो मात्र व्यवहारात आणि आचरणात मात्र विसंगती आढळून येते कृष्णाच्या चरित्रातील दही दुधाची चोरी या गोष्टीतून त्यांनी अध्यात्मकारण, भक्तीकारण,समाजकारण आणि राजकारण ही चारही कारणे होती त्याचा शोध आपण सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या