आष्टी (प्रतिनिधी) राज्यात महायुतीचे सरकार सत्तारुढ झाले आहे. बीड जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रीपदी ना.पंकजाताई मुंडे व ना.धनंजय मुंडे यांना संधी मिळाली आहे.त्यांचा कोणी सत्कार केला नसला तरी आपण आष्टीत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना.पंकजाताई मुंडे,ना.धनंजय मुंडे यांचा लवकरच भव्य सत्कार करु, कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून जावू नये निवडणुकीत जय पराजय होतच असतो. मी राजकारण सोडणार नाही.लोकांसाठी राजकारण करीतच राहणार आहे.पराभवाने खचून जावू नका;संघर्ष करीत करीत राजकारण करतच राहणार असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता चिंतन बैठकीत बोलताना केले. माजी आ.भीमराव धोंडे यांनी लोकाग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढवली परंतु पराभवास सामोरे जावे लागले.आष्टी कार्यकर्ता चिंतन बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ.भीमराव धोंडे हे होते.याप्रसंगी व्यासपीठावर युवा नेते अजयदादा धोंडे,जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,माजी जि.प.सदस्य रामराव खेडकर,रामदास बडे,दशरथदादा वनवे,ॲड.रत्नदिप निकाळजे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरूड,जि.प.सदस्य सुरेश माळी,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,अशोक दहिफळे,सरपंच दादासाहेब जगताप,माऊली पानसंबळ,हरिभाऊ जंजिरे,माजी सभापती नियामत बेग,माजी सरपंच बबनराव औटे,पोपटराव सिरसाट,ॲड.मोहन खेडकर,ॲड.संभाजी दहातोंडे,देवीदास शेंडगे, महारूद्र खेडकर,राजपल शेंडगे,विठ्ठलराव बन्सोडे, हरिभाऊ जंजीरे,यासीनभाई शेख,अस्लम बेग,अस्ताक शेख,छगन तरटे,दिलीप काळे,अंकुश मुंढे,दादा जगताप,बाबु कदम,दादा विधाते,बाळासाहेब शिंदे,आदिनाथ गवळी,संजय मिसाळ,विष्णू दहिफळे,बाबा गर्जे,कृष्णा गोल्हार,गौतम सावंत,शेख अन्सारभाई,युवराज खटके,रघुनाथ शिंदे,बबन सांगळे,सदा पाटील दिंडे,राजेंद्र खाडे,एकनाथ सानप,अभय गर्जे,श्रीराम गर्जे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मस्साजोग येथील सरपंच कै.संतोष देशमुख व परभणी येथील कै.सोमनाथ सुर्यवंशी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की,विधानसभा निवडणुकीत सर्वांनीच खुप कष्ट घेतले परंतु आपल्या कष्टाचे चीज झाले नाही.मला ना.पंकजाताईं मुंडे व इतर काही मित्रांनी सांगितले होते की,अपक्ष लढणे अवघड आहे.पण लोकांच्या आग्रहामुळे रिंगणात उतरलो.पण आजच्या काळात अपक्ष लढविणे सोपे नाही.शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मोफत विज पुरवठा योजना,लाडकी बहीण योजना यामुळे मतदान फिरले असावे तसेच ईव्हिएम मशिनचाही संशय आहे. राज्यातील १०० मतदार संघात पराभुत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात तक्रार केली आहे. निवडणूक प्रक्रीयेत सुधारणा होणे आवश्यक आहे. भविष्यात ते होईल.पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव महिला होऊ शकतो.शेतकरी जसा शेवटपर्यंत शेती करतो तसे आपण देखील शेवटपर्यंत राजकारण करू.तसेच सरकारच्या माध्यमातून लोकांचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु.ना.पंकजाताईं मुंडे यांच्या दोन सभा झाल्या नसत्या तर माझा विजय झाला असता.आपण आरक्षण मुद्यावर वादग्रस्त ठरलो नाही.सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले तसे संस्कार माझ्यावर आहेत.नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दौलावडगाव ते लिंबादेवी हा रस्ता काॅंक्रिट करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.तसे पत्र त्यांना दिले आहे. युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की,राज्यात ना. पंकजाताई मुंडे यांना चांगले स्थान आहे.त्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल.पराभवाने कोणीही खचून जावू नये.विधानसभा निवडणुकीत कोणी आपले प्रामाणिकपणे काम केले किंवा कोणी केले नाही याची नोंद आम्ही घेतली आहे.भविष्यात चांगले काम करणे सुरुच ठेऊ कारण प्रत्येक एक दोन वर्षाला वेगवेगळ्या निवडणुका आहेत. झाले गेले विसरून जा,२०२५ या नविन वर्षात नव्या जोमाने कामाला सुरुवात करा.जरी आपला पराभव झाला तरी मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नव्या उमेदीने प्रयत्न करु.पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की,विधानसभा निवडणुकीत आपले नियोजन व्यवस्थित झाले.ज्या गावात कार्यकर्ते प्रचारासाठी घरापर्यंत गेले त्या गावात मताधिक्य वाढले आहे.आपल्याला भाजपाने पक्षाबाहेर काढले असले तरी आपण दुसऱ्या पक्षात गेलो नाहीत.निवडणूकीत हार जित होतच असते.ना.पंकजाताईं मुंडे आणि ना.धनंजय मुंडे हे दोन मंत्री असल्याने काळजी करु नका. येणारा काळ आपल्यासाठी चांगला राहणार आहे.भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत युती न करता आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. दशरथदादा वनवे यांनी सांगितले की,चिंतन हे नेत्यांनी नाही तर कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे.मु़ंडे घराण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी नेहमीच सहकार्य केले परंतु आता विकासावर मतदान राहिले नाही.भविष्यात युवा नेते अजयदादा हे तुमची राजकीय परंपरा निश्चित चालवतील.माजी जि.प.सदस्य रामराव खेडकर यांनी सांगितले की,ना.पंकजाताई मुंडे मंत्री झाल्यानंतर फक्त शिट्टीवाल्या कार्यकर्त्यांनीच तोफा वाजवल्या व आनंद साजरा केला.शिरूर तालुक्यात शिट्टीला चांगले मतदान झाले.धोंडेसाहेब तुमचे वय झाले असे समजू नका,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा आदर्श समोर ठेवा.माजी जि.प.सदस्य रामदास बडे यांनी सांगितले की,राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला.आपण अपक्ष होतो.आपल्या नेत्या ना.पंकजाताई मुंडे याच आहेत.ना.पंकजाताईं यांना कोणी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी फरक पडत नाही,आता त्या कॅबिनेट मंत्री आहेत. माजी सभापती नियामत बेग यांनी सांगितले की,मतदानाच्या दिवशी सायंकाळ नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली हा संशोधनाचा विषय आहे.रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की,विरोधकांसोबत राहणारे काही लोक आपल्यात आहेत हे दुर्दैव आहे.कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे राहुन काम केले पाहिजे.याप्रसंगी ॲड.रत्नदिप निकाळजे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी माजी आ.भीमराव धोंडे हे कार्यकर्त्यांना पोरके होऊ देणार नाहीत.सरपंच दादासाहेब जगताप यांनी सांगितले की,भविष्यात माजी आमदार भीमराव धोंडे हे लोकांच्या सेवेत राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून जाऊ नये.अशोक दहिफळे म्हणाले की,भविष्यातील राजकारण करण्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्ते टिकवणे गरजेचे आहे. प्रामाणिक रहा, प्रामाणिकपणे काम करा.राजपाल शेंडगे म्हणाले की,ज्यांना माजी आ.भीमराव धोंडे यांच्या सोबत काम करायचे आहे त्यांनी तन मन धनाने काम करावे.राज्यात महायुतीचे सरकार सत्तारुढ झाले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,ना.पंकजाताई मुंडे,ना.धनंजय मुंडे,सभापतीपदी राम शिंदे यांच्या निवडीबद्दल एकमताने अभिनंदनाचा ठराव मांडला.कार्यक्रमास विकी शेकडे,विठ्ठलराव बनसोडे,युवा नेते अभयराजे धोंडे,राजपाल शेंडगे,लाभेश गाडेकर, दिलीपराव काळे,रावसाहेब लोखंडे,रघुनाथ शिंदे,बाबुराव कदम, पांडुरंग गावडे,चेअरमन राजेश धोंडे,आस्ताक शेख,ह.भ.प. पांडुरंग कर्डिले,हादी शेख,विष्णू कराळे,अंकुश मुंढे,माजी जि.प. सदस्य सतिशमामा झगडे,शेख अन्सारभाई,राजेंद्र खाडे,मतीन भाई शेख,संजय कांकरिया,सरपंच ज्ञानदेव केदार,युवराज खटके, चंद्रशेखर साके,माजी पं.स.सदस्य संजय धायगुडे,सरपंच संजय विधाते,चेअरमन बाळासाहेब शिंदे,गौतम ससाणे,गौतम सावंत,दादा विधाते,हरिचंद्र बोडखे,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शेख,विठ्ठलराव लांडगे,गणेश सिरसाठ,सरपंच माऊली वाघ,कृष्णा गोल्हार,आजिनाथ गवळी,कुंडलिक आस्वर,आण्णासाहेब लांबडे,अभय गर्जे,इंजि.एन.एम.बडे,सरपंच भरत जाधव,शहादेव खेडकर,लिंबराज कर्डीले,सुधीर ढोबळे,अमर माळी,वैभव बडे,विकास वनवे,रामदास गिते,प्रा.डाॕ.शाम सांगळे,माजी सभापती अनिल जायभाय,दादासाहेब विधाते,नईम शेख,परमेश्वर खेडकर,सरपंच विष्णू दहिफळे,संजय मिसाळ'अस्लम बेग यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गौतम ससाणे ,
दादासाहेब विधाते,दिलीप काळे,अशोक बेद्रे,सरपंच संजय विधाते,याशिनभाई शेख,बबन सांगळे,कृष्णा गोल्हार,अशोक साळवे,नियामत बेग,रामदास बडे,रावराव खेडकर,राजपाल शेंडगे यांची भाषणे झाली. सुत्रसंचलन निलेश दिवटे,प्राचार्य बाळासाहेब खेमकर तर आभार सईद चाऊस यांनी मानले.