Ticker

6/recent/ticker-posts

सुंदर हस्ताक्षर व रांगोळी अक्षरलेखन कार्यशाळा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळात अंतर्गत दि.११ डिसेंबर रोजी धामणगाव येथील जि.प.के.प्रा.शाळेत सुंदर हस्ताक्षर व रांगोळी अक्षरलेखन याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. सुंदर हस्ताक्षर तज्ञ व रांगोळी अक्षरलेखन अनिल बेद्रे यांनी सखोल असे विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याविषयी सर्व अक्षरांचे स्ट्रोकनिहाय एक एक अक्षरांची स्ट्रोक समजावून सांगितले.काना, मात्रा,वेलांटी, उकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन व सखोल माहिती सांगितली. त्याचबरोबर रांगोळी अक्षरलेखनविषयी सविस्तर अशी माहिती दिली. जि.प.के.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक हिरामण पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही हस्ताक्षर व रांगोळी अक्षरलेखन कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हिरामण पोकळे व सर्व शिक्षक वृंद धामणगाव व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या