Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी मतदार संघाचे अष्टपैलु नेते आ.सुरेश धस यांना कॕबीनेट मंत्री करावे ............ सभापती रमजान तांबोळी यांची मागणी

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी विधानसभा मतदार संघाची आणखी प्रगती करण्यासाठी आणि मतदार संघाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वसमावेशक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे लोकनेते आ. सुरेश धस यांना महाराष्ट्र मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घ्यावे अशी मागणी आ.धस यांचे कट्टरा समर्थक कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील भाजप नेते,आष्टी विधानसभा मतदार संघातुन निवडणुकीत ७८ हजाराच्या मताधिक्याने निवडून आलेले आ. सुरेश धस यांना अठरापगड जातीच्या मतदारांनी भरघोस मते देऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.आ. सुरेश धस हे पाचव्यांदा प्रचंड मतांनी आमदार म्हणून विधानसभेत गेले आहेत. सुरेश धस यांना मतदार संघातल्या विविध समस्या अचुक माहिती आहेत.शेतकरी वर्गाला दुध दरवाढ अनुदान अवकाळी अनुदान, जलसिंचन विहिरी, शेततळे, गायगोठे, गाळ उपसणे,कोल्हापूरी बंधारे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुदान वाढ,रमाई घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच मेहकरी धरणाच्या कामासाठी व अंमलबजावणीसाठी प्रभावीपणे राबवण्यासाठी सुरेश धस यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.आष्टी तालुक्यातील रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे यापुढेही आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील गाव खेड्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी आ.सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केली आहे.आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नातून पाटोदा तालुक्यात नाफेड अंतर्गत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड महा किसान संघ कृषी प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यातील वैद्यकीन्ही कुसळंब, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील नागरेवाडी व शिरूर येथे सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आ.सुरेश धस यांनी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा पुरावा केलेला आहे.जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आष्टी,पाटोदा,शिरूर तालुके सुजलाम,सुफलाम करण्याची क्षमता ही आ.सुरेश धस यांच्यामध्येच आहे.त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करणे आष्टी मतदार संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जनतेची भावना आहे. चौकट ----------- आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे आ.सुरेश धस यांना बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कॅबिनेट मंत्री व बीडचे पालकमंत्रीपद देऊन जनतेला त्यांच्या हक्काचा लोकनेता द्यावा. जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणजेच आ.सुरेश धस यांना मंत्री करून जनतेच्या मनातील मंत्री व पालकमंत्री करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.उत्तराखंडामधील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या काम मदत व पुनर्वसन मंत्री असताना आ.धस यांनी केलेली कामगिरी ऐतिहासिक कामगिरी म्हणून आजही ओळखली जाते तसेच दुष्काळ पडल्यानंतर आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघात लाखो गाईंचा सांभाळ करून आ.सुरेश धस यांनी मोठा आदर्श निर्माण केला होता.गोवंश संवर्धन करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.कोरोना काळामध्ये विविध ३३ ठिकाणी कोविड सेंटर उभारून, अत्यवस्थ रुग्णांना संभाजीनगर,पुणे,मुंबई या ठिकाणी आ.सुरेश धस यांनी आरोग्यसेवा उपलब्ध करून जीवनदान दिले आहे.पाचव्यांदा आष्टी मतदार संघातून ७८ हजारांची लीड मतदार संघात मिळाल्याने मतदार संघातील जनतेची भावना लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्री करून संपूर्ण मतदार संघाची भावना जपावी अशी मागणी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केली आहे. ----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या