
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
हॉटेल मोदी ग्रँड अदालत रोड संभाजीनगर येथे प्रज्ञा
बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राच्यावतीने ११ वे. राज्यस्तरीय साहित्य संमेलन व
पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य
शासनाच्या समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी साहित्यिक,विचारवंत उत्तम
दासु तरकसे (आसरडोकर) यांचा नुकत्याच प्रकाशित झालेल्या शाहीची नोंद या
काव्यसंग्रहाला या अगोदर वेगवेगळ्या संस्थेचे ७ पुरस्कार उत्कृष्ट साहित्य
वाङ्मयाचे मिळालेले आहेत.या संस्थेचा मानाचा " उत्कृष्ट साहित्य भ्रमर " पुरस्कार
२०२४ या पुरस्काराससाठी सुद्धा या काव्यसंग्रहाची निवड झालेली आहे. या कार्यक्रमात
तो सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार होता परंतु या काव्यसंग्रहाचे कवी उत्तम दासू
तरकसे हे विधानसभा निवडणूक २०२४ या ड्युटीमध्ये व्यस्त असल्याने या कार्यक्रमात हजर
राहू न शकल्याने हा पुरस्कार त्यांना विधानसभा निवडणूक २०२४ ची ड्युटी संपल्यानंतर
संस्थेच्या कार्यालयात आमंत्रित करून त्यांना संस्थेचे सचिव मकरंद घाणेकर (ज्येष्ठ
साहित्यिक) यांच्या हस्ते सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार
सन्मानपूर्वक प्रदान केल्यानंतर उत्तम तरकसे यांनी या पुरस्कारासाठी माझ्या
काव्यसंग्रहाची निवड केल्यामुळे संस्थेच्या अध्यक्षा सौ. लीना देगलूरकर, सचिव मकरंद
घाणेकर व इतर सर्व पदाधिकारी व पुरस्कारासाठी नेमलेल्या निवड समितीचे सर्व
पदाधिकारी यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या