Ticker

6/recent/ticker-posts

नांदुरचे एकनाथ विधाते यांना मातृशोक............ श्रीमती केशरबाई बलभीम विधाते यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील नांदूर येथील विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री एकनाथ विधाते, सेवानिवृत्त कृषी अधिकारी परशुराम बलभीम विधाते,नामदेव बलभीम विधाते यांच्या मातोश्री श्रीमती केशरबाई बलभीम विधाते ( वय ८९) यांचे वृद्धापकाळाने गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. १० दिवसापूर्वीच त्यांचा नातू युवा उद्योजक प्रशांत एकनाथ विधाते याचे अल्प आजाराने निधन झाले होते.असा हा दुःखाचा आघात विधाते कुटुंबीयांवर झाला. त्यांचा अंत्यविधी नांदूर अमरधाम येथे झाला. यावेळी अभयराजे भीमराव धोंडे,प्रा.डाॕ. बाळासाहेब धोंडे,उत्तम धोंडे,मेजर अनिल गिलके,रमेश मुळे, अनिल गायकवाड, धर्मनाथ शिंदे आदी राजकीय ,सामाजिक , धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यापाठीमागे तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या