

साधारणतः चार दशकांपेक्षा अधिक काळ सातत्याने जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न
कागदावर उतरवत शासन दरबारी मांडण्याचा अव्याहतपणे केलेला पराक्रम...अखेर वाचकांच्या
मनी उतरला असूनष दैनिक झुंजारनेताच्या या वार्ताहर बंधूंचा यथोचित सन्मान वाचकांनी
विनम्रपणे त्याची उत्तराई केली आहे.पत्रपंडित स्व.मोतीरामजी वरपे दादांच्या अथक
परिश्रमातून आणि बुद्धी कौशल्यातून निर्माण झालेल्या दैनिक झुंजारनेताच्या
कार्यशाळेतून अनेक लेखणी मल्ल तयार झाले.यात बीड जिल्ह्यात जवळपास शंभर
वार्ताहरांनी या तालमीत आपली लेखणी संपन्न केली.आज ५७ वर्षे पुर्ण करुन ५८
व्या.वर्षीत दैनिक झुंजारनेताने पदार्पण केले आहे. झुंजारनेताची टिम
राजकीय,सामाजिक, आर्थिक,धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक सांस्कृतिक आदीसह सर्वच
क्षेत्रात प्रभावी लेखन करीत आहेत.वाचकांनी केलेले हे प्रेम कदापिही न विसरता आणि
डोक्यात हवा न भरू देता सर्वसामान्य,गोरगरीब, दीनदलित, दुबळ्या, अनाथ,अपंग,शेतकरी
शेतमजूर आणि वंचित घटकांच्या प्रश्नावर सडेतोड लेखन दैनिक झुंजारनेताच्या
माध्यमातून अव्याहतपणे सुरुच राहील हा वरपे दादांचा वसा आणि वारसा संपादक अजितदादा
वरपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू राहील.
ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून
वाटचाल करणारा झुंजारनेता आणि झुंजारनेताच्या लोकप्रियतेचा तेजोमय प्रवास
---------------------------
समाजाचा महत्त्वाचा अंग असलेल्या शेतकरी,शेतमजूर,
वंचित घटकांच्या जीवनाचा वास्तव वेध घेणारे आणि बीड जिल्ह्याच्या आत्म्याचा आवाज
बनलेले लोकप्रिय दैनिक झुंजारनेताचे संपादक पदावर कार्य करताना समाज घटकातील
बुद्धीवादी लोकशाही क्षेत्रातील महत्त्वाचा घटक ठरलेले ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या
मार्गदर्शन व विचार विनिमयातून वाटचाल करणारे झुंजार संपादक अजितदा वरपे आहेत.अजित
वरपे हे दैनिक झुंजारनेताला उज्ज्वल दीपस्तंभकडे नेणारा सरसेनापती आहेत.सर्वसामान्य
माणसांच्या जीवनाला उपयुक्त ठरेल अशी अनुकूल भाषा प्रत्यक्ष जीवन व्यवहारांमध्ये
वाटणारे सजीव संवाद हे झुंजारनेताच्या लेखणीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे.त्यादृष्टीने
यातील लेखन विकासाच्या अंगाने घेतलेला वेध असतो.सर्वसामान्य पत्रकार बांधवांच्या
विचारविनिमयातून, प्रसंगी जेष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनातून आपल्या दैनिकाची
वाटचाल करणारे दैनिक झुंजारनेताचे संपादक अजित वरपे यांची वाटचाल झुंजारनेताचे
संस्थापक संपादक स्व.मोतीरामजी वरपे (दादा) यांच्या आशीर्वादाने आणि वाचकांच्या
प्रचंड प्रेमामुळे यापुढे ही यशस्वी होईल यात शंका नाही.बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज
आणि मराठवाड्याची धगधगती तोफ दैनिक झुंजारनेताचे संपादक अजितदादा वरपे आहेत. बीड
जिल्ह्याच्या मातीतील क्रांतिकारी दैनिक म्हणून नावाजलेल्या दैनिक झुंजारनेताचे
संपादक अजितदादा वरपे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या अत्यंत खडतर आणि यशस्वी
कारकिर्दीची शासनाने दखल घेतली आहे.स्व.मोतीरामजी वरपेदादांनी अत्यंत परिश्रम आणि
कष्टातून दैनिक झुंजारनेताच्या रोपटे लावले. सातत्य,चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर
साप्ताहिक ते मराठवाडास्तरीय लोकप्रिय दैनिक अशी प्रतिमा निर्माण केलेल्या या
दैनिकाने वटवृक्षात रुपांतर केल्यानंतर सदैव सामाजिक भूमिका कायम ठेवली आणि म्हणूनच
शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा दैनिक झुंजारनेताची प्रतिमा आपलेपणाची, स्नेहाची आणि
क्रांतिकारी विचारांची म्हणून गणली गेली आहे.स्व. मोतीरामजी दादांच्या अथक
परिश्रमातून निर्माण झालेला झुंजारनेताचा प्रवास अविरत,अखंड सुरू आहे.रंजल्या-
गांजल्या दीनदलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर आणि वंचित घटक यांचा आवाज बनून
झुंजारनेताने सदैव कर्तव्य बजावले.गेल्या काही वर्षांपासून झुंजारनेताच्या
संपादकपदाची जबाबदारी संपादक अजितदादा वरपे यांनी अत्यंत समर्थपणे, सक्षमपणे घेतली
आणि प्रभावी,यशस्वीरित्या पेललीसुद्धा आणि म्हणूनच बीड जिल्ह्याचा आत्मा आणि
मराठवाड्याचा बुलंद आवाज म्हणून झुंजारनेताची प्रतिमा कायम राहीली.बीड जिल्ह्याच्या
या पवित्र सुगंधी मातीतील दैनिक झुंजारनेताच्या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त
ठरते.संपादक अजितदादा वरपे यांचा त्यांच्या वृत्तपत्राच्या सामाजिक,राजकीय,
धार्मिक,वैचारिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रातील कर्तव्य भूमिका आणि
गुणवत्तापूर्ण शब्दांकन आणि अर्थपूर्णता म्हणूनच त्यांचा गौरव होतो आहे. दैनिक
झुंजारनेताच्या ५७ व्या. वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा .....
संपादक अजितदादा वरपे यांना हार्दिक शुभेच्छा..... ---- लेखक उत्तम बोडखे,आष्टी.
दत्ता
0 टिप्पण्या