Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीवासियांच्या स्वप्नातील घरांची आम्ही करणार स्वप्नपूर्ती. मान्यवरांच्या हस्ते होणार अंबिका रेसिडेन्सीचे भूमिपूजन -- इंजि.बाळासाहेब भुकन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टीवासीय नागरिकांच्या स्वप्नातील घरांची स्वप्नपूर्ती आम्ही करणार असून यशोदीप कन्स्ट्रक्शन आणि समृद्धी यश डेव्हलपर्स यांचे द्वारे आष्टी येथे अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त असे १०० सदनिका बांधकाम करण्यात येणार आहेत. आज आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे माजी राज्य मंत्री सुरेश धस, माजी आ. साहेबराव दरेकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज गहिनाथगडकर, अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापु, ह.भप.महंत राधाताई सानप महाराज, यांच्या व ईतर महाराज यांच्या हस्ते अंबिका रेसिडेन्सीचे भूमिपूजन आणि फ्लॅट विक्री ऑफिसचे शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती यशोदीप कन्स्ट्रक्शन कंपनी आणि समृद्धी एस डेव्हलपर्सचे संचालक इंजि. बाळासाहेब भूकन यांनी दिली याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,अहिल्यानगर ते बीड यादरम्यान सात मजली टॉवर्स केवळ आष्टी येथे उभारण्यात येणार असून या रेरा कायद्यानुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.अंबिका रेसिडेन्सी येथे 2BHk चे ८४ फ्लॅट आणि 3BHk बीएचके १४ फ्लॅट आणि जिम क्लब हाऊस योगा सेंटर असे एकूण १०० फ्लॅटचे बांधकाम होणार आहे. सात मजली तीन टॉवर्समध्ये हे बांधकाम होणार आहे. या निवासी इमारतींमध्ये दोन बीएचके आणि थ्री बीएचके फ्लॅट उपलब्ध होणार आहेत. इमारतींपासून १२ मीटर रुंदीचा डीपी रोड मंजूर आहे.येथील रहिवाशांसाठी ही मोठी सुविधा आहे या तीनही इमारतींमध्ये आष्टी नगरपंचायत द्वारे आणि कन्स्ट्रक्शन कंपनी यांचे कडून पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बायोमेट्रिकल लिफ्ट बसवण्यात येणार असल्यामुळे अनोळखी नागरिकांना या इमारतीत मध्ये प्रवेश करता येणार नाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही मोठी उपलब्ध असेल असे सांगून ते म्हणाले की या सर्व फ्लॅटचे वास्तुशास्त्रानुसार बांधकाम करण्यात आले आहे.सर्व इमारतींना कॉमन लाईटसाठी सोलर सिस्टिमद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या निग्रणीखाली संपूर्ण परिसर येणार आहे. सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वतंत्र वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.या परिसरामध्ये जिम क्लब हाऊस योगा सेंटर चिल्ड्रन पार्क आणि खुल्या जागेमध्ये बाग बगीचा तयार करण्यात येणार आहे.अंबिका रेसिडेन्सीच्या सर्व फ्लॅटचे बांधकामाचा कालावधी २४ महिने एवढा असून फ्लॅट बुकिंग लवकर झाल्यास हा कालावधी कमी देखील होऊ शकतो.अंबिका रेसिडेन्सीच्या बांधकामासाठी स्वतंत्र आरएमसी काँक्रेट प्लांट उभा करण्यात आला आहे. त्याद्वारे अधिक गतिमान पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे फ्लॅटची बुकिंग करण्यासाठी १ लाख रु.एवढी रक्कम भरावी लागणार आहे भूमिपूजन कार्यक्रमापासून दीपावलीपर्यंत या फ्लॅटच्या बांधकामाचे दर ३००० रु प्रति चौरस फुट एवढा दर आकारण्यात येणार आहे त्यामुळे ग्राहकांनी या आकर्षवलीचा फायदा घ्यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या