
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी मतदार संघातील आष्टी,पाटोदा, शिरूर या तिन्ही तालुक्यांना
कृषी विभागाच्या इमारती नव्हत्या. त्या आपण कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या
माध्यमातून मंजूर करून घेतल्या आहेत. आता आष्टी तालुक्यातील कृष्णा- मराठवाडा उपसा
सिंचन टप्पा तीन अंतर्गत जलसंपदा विभागाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी
प्रशिक्षण केंद्राचा शेतक-यांना फायदा होणर आहे.शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सुविधा
देण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कधीही कमी पडणार नाही.
गुत्तेदाराने शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे दर्जेदार काम करावे असे आवाहन
आ. बाळासाहेब आजबे यांनी केले. कृषी विभागाच्यावतीने आ. बाळासाहेब आजबे यांच्या
प्रयत्नातून एक कोटी रूपायाचे कृषी प्रशिक्षण इमारतीचे भुमीपुजन गुरूवार दि.३
आक्टोबर रोजी आ.आजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी
जिल्हाकृषी अधिक्षक बाबासाहेब जेजूरकर,बीड जि.प.चे माजी सदस्य डॉ.मधुकर
हंबर्डे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,युवानेते यश आजबे,महेश
आजबे,जलसंपदा विभागाचे अधिकारी नितेश जाधवड, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे आदि
मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले, की,जलसंपदा
विभागाच्यावतीने हे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले.हे कुठे करायचा हा निर्णय मी कृषी
कार्यालयात बांधण्याचे ठरविले.या कृषी प्रशिक्षण केंद्राने शेतक-यांना मोठ्या
प्रमाणावर फायदा होणार आहे.मतदार संघातील तिन्ही तालुक्यात आपण तालुका कृषी
कार्यालय पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळाले असल्याचे आ.आजबे यांनी
सांगितले. आपल्या भागात अतिवृष्टी झालेली नाही.अजूनही आपल्या भागात पावसाचे प्रमाण
कमी आहे.अजूनही पावसाची शक्यता आहे.त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने शेतक-यांनी येथून
मोठ्या प्रमाणावर फायदा घ्यावा असे आवाहन आ.आजबे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे
अध्यक्ष जिल्हा कृषी अधीक्षक जेजूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक करतांना गोरख तरटे म्हणाले की, आष्टी तालुक्यात शेती मोठ्या प्रमाणावर
असून आपल्या शेतक-यांना शेती विषयक माहिती आणि प्रशिक्षण मिळविण्यास मदत
होते.आपल्या तालुक्यात ड्रॅगन फ्रुट,सफरचंद,स्टाॅबेरी यासारखे पिके येथे घेतले
आहेत.त्यामुळे हे प्रशिक्षण केंद्र झाल्यावर नक्कीच तालुक्याला फायदा होणार
असल्याचे तरटे यांनी सांगीतले.यावेळी शिरीषभाऊ थोरवे, साबळे, हरिभाऊ दहातोंडे,
शामराव फसले, बाळासाहेब पिसाळ, नगरसेवक नाजिम शेख, उत्तम पवार, आजिनाथ फसले, गाडे
मामा, नितीन मिसाळ,आजिनाथ साबळे, बशीरमामा शेख,ताराचंद्र कानडे, संदीप
गदादे,सोमीनाथ धुमाळ, चंदू कानडे, साईनाथ कांबळे, संदीप गायकवाड, नामदेव भिसे,
विश्वनाथ भिसे, आकाश गोंडे ,तुकाराम राऊत,सूर्यभान गदादे शेतकरी, ग्रामस्थ व मंडळ
कृषी अधिकारी,कृषि पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
0 टिप्पण्या