Ticker

6/recent/ticker-posts

एक हजार वर्षापूर्वीचे हेमाड पंथी बांधकामाचे पारगावचे जोगेश्वरीदेवी मंदीर ....................... सर्वात मोठा नवरात्रोत्सव साजरा करणारे जोगेश्वरीदेवी देवस्थान

उत्तम बोडखे,आष्टी -----------------
------------ आष्टी तालुक्यातील आष्टीपासून १३ कि.मी.अंतरावर पारगाव जो.येथे जोगेश्वरी देवीचे देवस्थान आहे.निसर्गरम्य ठिकाणी देवीचे मंदिर आहे.हे मंदिर एक हजार वर्षांपूर्वीचे हेमांडपंती बांधकामाचे आहे.संपूर्ण बांधकाम पूर्ण जुने आहे.ते अद्याप सुरक्षित आहे.मंदिर आवारात गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून मंदिरालगत मोठे सभागृह बांधले आहे.येथे भव्य असा नगारखाना आहे.मंदिराच्या चारही बाजूच्या मजबूत भिंती मंदिराच्या भव्यतेची ओळख करून देतात.मंदिरासमोर मोठी झाडी आहे.परिसर विविध झाडांनी वेलींनी नटलेला आहे.मंदिराच्या दोन्ही बाजूस तलाव असल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे.यावर्षी पारगांव जो. परिसरात चांगला पाऊस झाल्याने हिरवेगार पिके दिसत आहेत.धरणी मातेने हिरवा शालू पांघरलेला असल्याने नवरात्र उत्सवात हे विलोभनीय दृश्य देवी भक्तांना भुरळ घालणारे आहे.श्री चक्रधरस्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक यांनी या परिसरात भ्रमंती केल्याची आख्यायिका आहे.याठिकाणी अनुसया यांनी पूजा व सार पूजा केली होती ते हे स्थळ आहे.पारगांव जोगेश्वरी मंदिरात मराठी भाषेतील ग्रंथ लीळाचरित्र आहे.माहीमभटाने श्री चक्रधरांची लिहिलेले ते चरित्र एकत्रितरीत्या येथे सांगितले आहे श्री चक्रधर स्वामींनी या मंदिरासंबंधी सांगितले आहे की, मंदिराच्या बाहेर एक दगडी छत्री आहे.त्यांना मंदिरात जाता येत नाही ते लोक येथूनच दर्शन घेतात. मंदिरांमध्ये लक्ष्मीनारायणाच्या सुंदर अशा मूर्ती पूर्वाभिमुख आहे. " मंदिर कैसे निके मंदिर " मंदीर किती सुंदर आहे " या ओळीचा संदर्भ या निश्चितीसाठी उपयोगी पडतो चक्रधर स्वामी यांच्या पूर्वी हे मंदिर अस्तित्वात होते किमान एक हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. हिंदूची देवी आणि महानुभव पंथाची पूजा स्थळ म्हणून ओळखले जाते.मंदिराचे प्रस्तावावर बांधलेल्या रुंद भिंती सभामंडप गाभारा सगळे कसे प्रसन्न वातावरणात आहे.देवीचा मुखवटा तांदळाचा हे काही भक्तगणांना प्रथम दर्शनी हा मुखवटा भुरळ घालतो.मंदिराच्या प्रत्येक दगडावर वेलबुट्टी आहे काही दगडावर हत्ती अश्व युद्धाचे काही प्रसंग कोरलेले आहेत.या मंदिराच्या दारावर एक शिलालेख आहे.हा लेख आज पुरातन नाही इतर शिलालेखांचे स्वतंत्र नोंदी आहेत मात्र या शिलालेखाचा कुठेही उल्लेख झालेला नाही.ऊन वारा पाऊस यांना सामना देणारे हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत उभे आहे.देवीच्या साडेतीन पीठांपैकी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे ही उपस्थान असल्याची आख्यायिका सांगण्यात येते. भक्तांच्या भक्तीला प्रसन्न होऊन भक्तगणांची इच्छापूर्ती करणारी ही जागृत देवी आहे.या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचा सुंदर असाच तांदळा आहे.सिंहासनारुढ झालेली आहे. देवीच्या अंगावर सोन्या- चांदीचे दागिने आहेत.या मंदिरात भक्तांना प्रवेश केला की, मन प्रसन्न होते.मंदिर परिसरात असणारे कुंडाचे पाणी नेहमी स्वच्छ व निर्मळ असते या देवस्थानला जाण्यासाठी आष्टी येथुन नवरात्र उत्सवात आष्टी बस आगारातर्फे बसची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रातून येथे लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात नवरात्र महोत्सवात देवीची पहाटे पुजा काकड आरती दुपारी तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होतो. परिसरातील हजारो भक्त या उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.पारगाव येथील देवीचे भक्त यादरम्यान ९ दिवसाचे उपवास करतात हे उपवास श्रद्धेतून केले जातात देवीचे मंदिर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र उत्सवात केले जाते. त्यामध्ये आराधी गीत,भजन, कीर्तन, रात्री जागर, मातेश्वरी ग्रंथाचे वाचन देवीच्या ओव्या अधिक कार्यक्रम होतात. देवीला प्रतिदिनी दुपारी किमान पाच हजार नागवेली पानांचा हार चढविला जातो.देवीच्या मुखवट्यावर आल्यावर देवीची विलोभनीय मूर्ती भक्तजनांना अधिकच भुरळ पाडून जाते. ही शेण भक्तगणांना प्रसाद म्हणून दिला जातो पण खाल्ल्यावर थुंकू नये असे सांगितले जाते. देवीचा होम अष्टमीच्या रात्री सुरू होऊन नवमीच्या प्रारंभी समाप्त होतो विजयादशमीच्या दिवशी पालखी अंगणापासून आल्यावर पारगाव गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.यावर्षीही येथे हरिनाम सप्ताह होत आहे. -------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या