आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील केरूळ येथे जगदंबा देवीच्या घटस्थापनाच्या निमित्ताने देवीची पालखी टेंभीकडे जाताना पालखीला खांदा देऊन ढोल वाजवत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पालखीचे स्वागत केले. खिळद येथे येडेश्वरी देवीच्या घटस्थापनाच्या निमित्ताने दर्शन घेतले.घटस्थापना निमित्ताने देवी पर्वाला खुप महत्व आहे. देविनिमगांव येथे मिरावली बाबांचे दर्शन घेतले तर ठिकठिकाणी ग्रामदैवताचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी दर्शन घेतले. दौऱ्यात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे , इतर कार्यकर्ते सोबत होते. किन्ही येथे बोलताना सुभाष काकडे यांनी सांगितले की, माजी आ.भीमराव धोंडे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोठे आहे.२० वर्षात त्यांनी मतदार संघाचा चांगला विकास केला आहे. सरपंच दादासाहेब जगताप यांनी सांगितले की, माजी आ. भीमराव धोंडे यांच्या कार्यकाळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला आहे. शैक्षणिक बाबतीतही मोठी प्रगती केली आहे.उर्वरित विकासासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा.रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की,भीमराव धोंडे आमदार असताना मला संजय गांधी कमिटीवर घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो निराधारांना मानधन सुरू केले. त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. आष्टी तालुक्याचा विकास करणे हेच त्यांचे ध्येय आहे.ठिकठिकाणी माजी सरपंच बबनआबा काकडे, माजी चेअरमन शेख जमशेदभाई, बाबुराव पाटील सुर्यवंशी,एकनाथ काकडे, माजी उपप्राचार्य भाऊसाहेब ढोबळे, माजी सरपंच आबासाहेब पोकळे, ज्ञानेश्वर गिते, गणेश गिते, ग्रा.पं.सदस्य सुरेश वनवे,बाबासाहेब वनवे, ग्रा.पं. सदस्य शहादेव गर्जे, उद्धव गर्जे यांची भाषणे झाली. वेगवेगळ्या गावात झालेल्या काॅर्नर सभेस चेअरमन दत्तु पवने, माजी पं. स. सदस्य मधुकर अनारसे,माजी उपसरपंच गंगाधर श्रीखंडे,संजय केदारी, पोपट मुटकूळे, माजी सरपंच बबनराव काकडे, विष्णू महाराज वनवे, माजी सरपंच अशोक राऊत, कैलास श्रीखंडे, पंढरीनाथ मुटकुळे,सोपान मुटकुळे, बाबासाहेब आंधळे,खेंगरे, एकनाथ काकडे, भरत भवर,मुरलीधर मडके, अतुल गावडे, अमोल चाटे, बंकटसिंग परदेशी, विठ्ठल हातवटे, अर्जुन जवणे, दादासाहेब पाचे, राजु भाई पठाण, मोहनराव सातपुते, प्रभाकर काकडे, सागर अनारसे, भोनानाथ दहिफळे, चंदनशिव साळवे, जब्बारभाई शेख, झगडे मामा, विठ्ठल फाळके, नानासाहेब ढवळे, डॉ.मनोज पाचे, आसाराम अनारसे, दिलीपराव पोकळे, सरपंच दत्तात्रय खोटे, ग्रा.पं. सदस्य बिभिषण भवर, राम झगडे, बाबासाहेब ढवळे, युवराज साळवे, पॅंथर साळवे, अशोक गिते, खैरे मुकादम, रघुनाथ पाखरे, दिनकर आंधळे, आजिनाथ आंधळे, परमेश्वर आंधळे ,सतीश आंधळे, कृमादास आंधळे, मारुती मरकड, बिभिषण गवारे, रामदास खिलारे, ज्ञानेश्वर पोकळे,रामराव जगताप, प्रविण खंडागळे, सरपंच भाऊसाहेब कोकरे, माजी सरपंच दत्तोबा शिंदे, मुरलीधर विधाते, ज्ञानदेव गिते, कर्डीले, सोनाजीराव पोकळे, बबनराव सिरसाठ, कैलास गिते, भगवान गिते, पो. पाटील अशोक केरूळकर, कुंडलिक मिसाळ, मधुकर वनवे, सुरेश जगताप, रोहिदास भगत, आडकर देवा,आसाराम खिलारे, शिवाजी खिलारे, श्रीमंत गवारे, अज्जूभाई, पांडुरंग खंडागळे,विश्वनाथ भवर, गुलाबराव भवर,भरत महाराज, संतोष बन,रंगनाथ बन, बबन बन, सूर्यभान धुमाळ,शिवाजी बन,दिलीपराव पोकळे, रघुनाथ पाखरे,गणेश पोकळे, अजिनाथ पोकळे, बाळु पिंपळे, पोपट खंडागळे, संभाजी खंडागळे, युनुस शेख, अप्पासाहेब पोकळे,उमेश बन, संतोष बन उपस्थित होते