आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय मुंबई व बीड जिल्हा क्रीडा कार्यालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आज जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयचा १७ वर्षाखालील संघ यामध्ये इयत्ता १०वी. चे विद्यार्थी सुमित सतीश रंधवे, रोहित तुळशीराम माने, पवन हरिभाऊ डोके, विकास बंडू जरे, इयत्ता ९ वी.चा विद्यार्थी नैतिक हनुमंत डोके आणि कु. ज्ञानेश्वरी नितीन धनवे हे सर्व विद्यार्थी बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने विजेते ठरले आहेत. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,संस्थेचे उपाध्यक्ष डाॕ.अजय धोंडे, शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ सरकाळे , क्रीडा शिक्षक अशोक डोके,मलखांब शिक्षक बबलु टेकाळे,अमोल निमोणकर,निलेश गोड, सागर डोके,संस्थेचे प्रशासन आधिकारी डाॕ.डी.बी.राऊत,प्रा. शिवदास विधाते, माऊली बोडखे सर ,संजय शेंडे सर व शाळेचे सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या