

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक
शाळेमध्ये झालेल्या ग्रामीण शालेय वक्तृत्व स्पर्धेत धामणगाव येथील इंदिरा कन्या
विद्यालयाची आरती नामदेव जीवडे हिने प्रथम क्रमांक तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक
शाळा पालवेवस्ती येथील आकांक्षा बुवासाहेब पालवे हीने द्वितीय क्रमांक पटकविला.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धामणगावची नम्रता राजेंद्र मुळे हिने तृतीय क्रमांक
मिळवला. दिव्या पोपट जीवडे व श्रावनी शरद लोखंडे या दोघींनी उत्तेजनार्थ बक्षीस
मिळवले.वक्तृत्व कलेतून उद्याचे नेतृत्व घडावे या हेतूने मराठा सेवा संघाच्यावतीने
या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा
संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी जंजिरे हे होते.आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये
इंजि.जंजिरे म्हणाले की,समाजातील मोठ्या समुदायासमोर आपल्या भावना,आपले विचार
व्यक्त करण्यासाठी वक्तृत्व कला हे प्रभावी माध्यम आहे.शालेय जीवनामध्येच
विद्यार्थ्यांनी हा गुण आत्मसात करावा . यापुढील शालेय वक्तृत्व स्पर्धा दिवाळीनंतर
खुंटेफळ केंद्रावर घेण्याचे त्यांनी जाहीर केले. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा
सौ. सुवर्णाताई गि-हे,भास्कर निंबाळकर,डॉ. दत्ता नरसाळे,बन्सीबापु मोरे,सरपंच मनोज
गाढवे,शालेय समितीचे अध्यक्ष शरद चौधरी आदि उपस्थित होते. यावेळी होती.स्पर्धेचे
परीक्षक म्हणून प्रा.डॉ. गायकवाड,संतोष दाणी, मिलिंद नेटके यांनी काम
पाहिले.प्रास्ताविक भाषण संयोजक जेष्ठ पत्रकार ॲड.सीताराम पोकळे यांनी केले .
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवीयत्री संगीता होळकर यांनी तर हर्षदा झिंजुर्के
यांनी मानले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष हिरामण पोकळे,
मोरे सर,स्नेहलता थोरवे मॅडम, राऊत सर, ढोबळे सर ,पत्रकार दादा पवळ , यजमान शाळेतील
शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या