Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत बाळुदेव अॕक्वाचे बबन महाराज व सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन

आष्टी (प्रतिनिधी) नोकरीच्या मागे न धावता व्यावसायीक झाले पाहिजे.नोकरी देणारे अधिकाधिक युवक युवती तयार झाले तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताची वाटचाल अधिक गतीने निश्चित होईल. आष्टी मतदार संघातील साबलखेड गावच्या ज्योतिराम देसाई यांनी सुरु केलेल्या 'श्री संत बाळूदेव ॲक्वा'या शूद्ध पाण्याच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन करताना आनंद झाला.अत्यल्प दरात नागरिकांना शुध्द जल तर मिळेलच शिवाय स्वास्थ देखील निरोगी राहील.देसाई परिवाराला नवीन व्यवसायासाठी सदिच्छा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस व ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले. याप्रसंगी माजी आ.साहेबराव दरेकर, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,पांडूतात्या झिंजुर्के,माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड,माजी सभापती अंकुश चव्हाण,रा.काँ.तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके,नवनाथ शेळके,वैजीनाथ रायते,संजय काळे,नितीन करडूळे,ह.भ.प.भगत महाराज सरपंच शिवाजी बुरगुले गोरख गाडे,निलेश गाडे आजिनाथ शेळके,नवनाथ
गाडे,लक्ष्मण देसाई,काकासाहेब देसाई,प्रवीण देसाई, दादासाहेब देसाई,साबलाखेड ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या