चंद्रबोधी पाटील यांची द बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियामधून हकालपट्टी .................... संस्थेच्या नियमांचे पालन न केल्याने व मनमानी केल्याच्या आरोपावरून विश्वस्त सदस्यत्व संपुष्टात आणून हकालपट्टी करण्याची ही कारवाई
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.के.भंडारे मुंबई यांच्या हवाल्याने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे बीड जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे यांनी माहिती देताना सांगितले की,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय विश्वस्त अध्यक्ष डॉ. हरीश रवालिया,राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॕ.भीमराव यशवंतराव आंबेडकर, कॅप्टन डॉ.प्रवीण निखाडे आंतरराष्ट्रीय सचिव,एस.के.भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.एस.एस.वानखेडेचे राष्ट्रीय सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने, द बुधिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विश्वस्त सदस्य चंद्रबोधी पाटील यांची संस्थेच्या नियमांचे पालन न केल्याने आणि मनमानी वर्तन केल्याच्या आरोपावरून ट्रस्टच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे पुढे माहिती देताना म्हणाले की,भारतातील २५ राज्यांतील राष्ट्रीय पदाधिकारी संस्था चालवतात.१३ सप्टेंबर रोजी एक पत्र जारी करून सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिका-यांना सावध केले आहे आणि चंद्रबोधी पाटील यांच्याशी भविष्यात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा संवाद करू नये,सोसायटी व संस्थेच्या सर्व सदस्यांनाही ताकीद देण्यात आली आहे.चंद्रबोधी पाटील यांच्याशी भविष्यात संपर्क साधु नये.चंद्रबोधी पाटील नावाच्या व्यक्तीच्या भ्रामक प्रचार आणि वक्तव्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.चंद्रबोधी पाटील यांचा यापुढे द बुधिस्ट सोसायटी ऑफ इंडियाशी कोणताही संबंध राहणार नाही आणि त्यांना कोणत्याही राज्यात संस्थेचे नाव वापरण्याचा अधिकार असणार नाही.दि.१३ सप्टेंबर २०२४ नंतर डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या सून आदरणिय मिराताई आंबेडकर या संस्थेच्या मुख्य संरक्षक असतील आणि आदरणिय डाॕ.हरीश रवलिया यांच्या नेतृत्वाखाली द बुधिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व संघटनात्मक कार्य संपादित आणि चालवतील.डाॕ.हरिश रावलिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डाॕ.भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष असतील.
0 टिप्पण्या