Ticker

6/recent/ticker-posts

ब्रम्हगांव येथील शृंगेरी विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर

 











आष्टी (प्रतिनिधी) 

तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.२४ सप्टेंबर रोजी आष्टी   तालुक्यातील ब्रम्हगांव येथील शृंगेरी विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी.जी. इनामदार (सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), श्रीमती एस.व्ही.उतकर उपस्थित होत्या.यावेळी वकील संघाचे सचिव संग्राम गळगटे,पोलीस प्रतिनिधी व्ही.आर.गुंडाळे,अ‍ॅड. सतीशकुमार गायकवाड, संस्थेचे प्रशासन अधिकारी माऊली बोडखे,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता माने -झगडे,     सहशिक्षक एस.जी. तरटे,आर.पी.पवार , एस.आर.ढोले,

एम.बी.निकाळजे, एस.बी.जाधव,एम.एम. झगडे,एस.एस.पठाण, श्रीमती एस.आर. ताम्हाणे,श्रीमती ए.व्ही. साळाप्पा,एस.आर.धोत्रे, एन.आर.बनसोडे, श्रीमती ए.पी.शिंदे,

वाय.ए.शेख,एन.आय. बेग,आर.पी.खिलारे  आदी उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश इनामदार यांनी जातिभेद निर्मूलनात कायद्याची भूमिका या विषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. संग्राम गळगटे यांनी स्त्रीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक दुष्कृत्ये यावर,अ‍ॅड. सतीशकुमार गायकवाड यांनी पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कायद्यात असलेली तरतूद यावर व्ही.आर. गुंडाळे यांनी वाहतूक नियमांविषयी तर अ‍ॅड. नितीन सानप यांनी रॅगिंग व हुंडाप्रतिबंधक कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.अ‍ॅड. नितीन सानप यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या