Ticker

6/recent/ticker-posts

युवा नेते किरण शिनगिरे यांचा जिल्हाधिकारी पाठक यांच्या हस्ते गौरव ...... उल्लेखनीय कार्याबद्दल सलग चौथ्यांदा वटनवाडी सेवा सह.संस्थेचा गौरव

 











आष्टी (प्रतिनिधी) 

आष्टी तालुक्यातील वटणवाडी सहकारी सेवा सोसायटीचे किरण शिनगीरे व सचिव अरुण पडोळे यांचा  बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी ठोंबरे,जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव,औसाचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) अशोक जाधव यांच्या हस्ते दि.२७ सप्टेंबर रोजी बँकेच्या ६९ व्या.वार्षिक सर्वसाधारण सभेत बीड येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी आ.रमेश आडसकर, माजी आ.केशव आंधळे, राजाभाऊ मुंडे, गंगाधर आगे,बीड जिल्ह्यातील सर्व सहकारी सेवा सोसायटी चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सहकारी सेवा सोसायटीचे सचिव अरुण पडोळे,जेष्ठ तपासणीस आष्टी तालुका शारद आजबे, सचिव महेश कोकणे, गणेश देशपांडे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या