आष्टी (प्रतिनिधी)
३० वर्षांपासून वेगवेगळ्या
आंदोलनांच्या माध्यमातून भूमिहीन,
भटक्या समाजातील लोक गावासह परिसरातील शासकीय गायरान जमिनी
अतिक्रमण करून कसत आहेत.वर्षानुवर्षे शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने यशवंत खंडागळे यांनी सतत
पाठपुरावा केला.त्यामुळे ४५ गावांतील गायरान जमीनधारकांना दिलासा
मिळाला आहे.९० दिवसांत अतिक्रमणे नियमित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना
दिले आहेत.आष्टी तालुक्यातील अनुसूचित
जाती,जमाती,भटके, विमुक्त,भूमिहीन
कुटुंबांतील अतिक्रमणधारक १९९०
पूर्वीपासून गायरान जमिनी कसतआहेत. यासंदर्भात २८ नोव्हेंबर १९९१ च्या शासन निर्णयातील तरतुदींचा
आधार घेऊन व तहसीलदार,उपविभागीय अधिकारी यांच्या अभिप्रायामध्ये वरील गायरान जमिनी या १९९० पूर्वीपासून असल्याचा उल्लेख आहे. ही बाब न्यायालयाच्या
निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च
न्यायालयाने आष्टी तालुक्यातील
अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे ९०
दिवसांत नियमित करावीत असा आदेश देत २० सप्टेंबर रोजी रिट
याचिका क्रमांक ८५६५ / २०२४ पारित केला.उच्च न्यायालयाने
जिल्हाधिकाऱ्यांना ९० दिवसां अतिक्रमणे नियमित करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्यावतीने अॕड अमरसिंह काकडे यांनी युक्तिवाद केला. मागील ३० वर्षांपासून आपण विविध आंदोलनांच्या माध्यमातून गायरान
जमीनधारकांच्या हक्कासाठी लढलो
आहोत.माजी मंत्री सुरेश धस यांच्या
मार्गदर्शनाखाली
शासनदरबारी पाठपुरावा करत आहे.आता या लढ्याला यश मिळणार असल्याने शेकडो गायरान जमीन धारकांना याचा लाभ होणार असल्याचे डॉ.बाबासाहेब
आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष
तथा याचिकाकर्ते यशवंत खंडागळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या