
आष्टी (प्रतिनिधी)
राज्यातील महायुती सरकारने येत्या १० दिवसात गावगाड्याच्या आणि सरपंच परिषदेच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरातील मोठ्या संख्येने सरपंच आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात शिळ्या भाकरी खाऊन आंदोलन करतील आणि सरकारचा निषेध नोंदवतील असा इशारा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी दिला आहे सन्मानित सरपंच आणि विकसनशील गाव यासाठी राज्यात काम करणाऱ्या सरपंच परिषदेने सरकारला हा इशारा दिला आहे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करून सरकार दखल घेणार नसेल तर आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. मोठया प्रमाणात आजी माजी सरपंच, उपसरपंच हे आझाद मैदानावर येतील या संदर्भात राज्यकार्यकारणीची नुकतीच एक बैठक सरपंच परिषदेच्या कोरेगाव पार्क पुणे येथील कार्यालयात सपन्न झाली. या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष ॲड.विकास जाधव,प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, कोअर कमिटी प्रमुख,आबासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे, राज्य कोषाध्यक्ष आनंद जाधव, महिला उपाध्यक्ष अश्विनी थोरात,किसन जाधव, शिवाजी आप्पा मोरे, सुप्रिया जेधे, नारायण वनवे, सुधीर पठाडे,राज्य प्रसिद्धी प्रमुख संजयबापू जगदाळे यांच्यासह विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या