




आष्टी मतदार संघात विठ्ठलाप्रमाणे कायम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे भीमराव धोंडे --
ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले
----------------------------------------
गहीनीनाथगड
आणि वामनभाऊंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी
-----महंत विठ्ठल महाराज
----------------------------------------
शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाच्या
माध्यमातून ज्ञान आत्मसात करुन शेतीपुरक उद्योग उभारावेत
---- माजी आ.भीमराव धोंडे
----------------------------------------
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात
शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी वैचारिक मंथन
----------------------------------------
फोटो
----------------------------------------
उत्तम बोडखे,आष्टी.
-----------------------
'छत्रपती शिवाजी महाराज, म.ज्योतिराव फुले,सावित्रीबाई
फुले,डाॕ.स्वामीनाथन यासारख्या महापुरुषांनी समाजाच्या भल्याचा विचार
केला.त्यांच्याच विचार कार्याला स्मरून प्रमाणिकपणे कार्य करणारे माजी आ.भीमराव
धोंडे आहेत.या प्रदर्शनातून उद्योग आणि शेतीचे ज्ञान बळीराजांना झाले.यातून
अनेकांना प्रेरणा मिळाली आहे असा विश्वास व्यक्त करत धोंडे यांच्या कार्याला
भविष्यात प्रबळ बळ मिळेल असे सांगत शिक्षण आणि शेतकरी हा भीमराव धोंडेंचा श्वास
असल्याने जय पराजयाचा लाटा अंगावर घेऊन सतत आष्टी पाटोदा शिरूर करांसाठी साक्षात
विठ्ठलाप्रमाणे कायम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माजी आ. भीमराव धोंडे आहेत असा
जाहीर गौरव हजारो शेतकरी सुशिक्षित युवक माता भगिनींच्यासमोर अ.भा.वारकरी मंडळाचे
राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी केला आणि त्यांना प्रचंड
टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी साथ आणि साद दिली. निमित्त होते आष्टी येथे पार पडत
असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे.रविवारी झालेल्या या वैचारिक मंथन मंचावर
श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज,राज्य कृषी प्रदर्शन
भरवणारे आष्टी,पाटोदा,शिरूरचे माजी आमदार लोकनेते शिक्षण महर्षी भीमराव
धोंडे,स्वागताध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डाॕ.अजयदादा धोंडे,
चेअरमन राजेश धोंडे,अभयराजे धोंडे,विठ्ठल बनसोडे,जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब
जेजूरकर, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, जेष्ठ संपादक प्रा.अनंत हंबर्डे, ह.भ.प.दिनकर
तांदळे महाराज, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,संजय कांकरिया,तालुका कृषी अधिकारी
गोरख तरटे, भाऊसाहेब सायंबर,पत्रकार उत्तम बोडखे,शंकर देशमुख, दिलीप काळे,बाजीराव
वाल्हेकर,आण्णासाहेब लांबडे, श्रीराम टेकाळे उपस्थित होते. यावेळी महंत विठ्ठल
महाराज म्हणाले की,वारकरी संप्रदायाचे मूळ अधिष्ठान श्रीक्षेत्र गहिनीनाथगड आणि संत
वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद धोंडे यांच्या पाठीशी कायम राहील त्यांचे कार्य महान
असून युवक, शेतकरी,बेरोजगार,वारकरी यांच्या सदैव सोबत राहण्याचा त्यांचा स्वभाव
आहे.ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी राज्य कृषी प्रदर्शनात विस्तृत विचार
मांडले.या प्रदर्शनामुळे धोंडे यांच्या कार्याला नक्की बळ मिळेल असा विश्वास व्यक्त
करत महात्मा फुलेंची शिक्षणाचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. आष्टी,पाटोदा,शिरूर
तालुक्यात त्यांच्यामुळे शिक्षणाची गंगा आली हे वास्तव असून तिन्ही तालुक्यात आज
शिक्षणाचा अक्षरशः खडा फुटला असा गौरव त्यांनी केला. लोककल्याणाचा विचार
स्वामीनाथांनी केला.या प्रदर्शनाने उद्योग आणि शेतीचे ज्ञान हजारो शेतकऱ्यांना
झाले.अनेकांना यातून प्रेरणा मिळाली असेल.आयुष्यात चढ-उतार यामध्ये स्थिर राहणारे
साधू असतात. जे जय पराजयाच्या लाटा अंगावर घेऊन सतत आष्टी पाटोदा शिरोरकरांसाठी
साक्षात विठ्ठलाप्रमाणे कायम उभी राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माजी आमदार भीमराव
धोंडे आहेत असा जाहीर गौरव केला.वयाच्या २७ व्या वर्षी पहिली निवडणूक लढणारे आणि
जिंकणारे ते असून आजही तितकीच तळमळ जिद्द,चिकाटी, आणि आत्मविश्वास असणारे ते नेते
आहेत.शिक्षण आणि शेतकरी हा भीमराव धोंडे यांचा श्वास असल्याचे सांगत केवळ मदतीने
माणूस मोठा होत नाही त्याला त्याच्या पायावर उभे करा.केवळ मदतीने माणसे आळशी बनतात
हे सूत्र माहीत असल्याने धोंडे यांनी शिक्षणाची गंगा सामान्यांच्या दारात उभी
केली.त्यामुळे आज गोरगरिबांची मुले अनेक पदावर जात स्वाभिमानाने जगू लागली. हा
शास्वत व्यापक कल्याणकारी विकास धोंडे यांनी केला असेही ते म्हणाले. अजयदादा धोंडे
यांच्याकडे कटाक्ष टाकत ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी... गडी दिसतो तरुण,
दाखवायचे आहे काहीतरी करून,लोक जाणार नाहीत धोंडेंना विसरून..!' गडी दिसतो तगडा,
अडचणींचा करतो रगडा, सगळ्यावर आहे त्याचा पगडा!.... अशा कविता रुपी चारोळ्यामधून
अजयदादांच्या भविष्यातील यशस्वी नेतृत्वाला विश्वासाची आणि आशीर्वादाची साथ दिली.
त्यासोबतच आपली टीम चांगली आहे फक्त संवगडी सांभाळा.. असा मौलिक सल्ला देत त्यांनी
वारकरी संप्रदायाची सदिच्छा आणि आशीर्वादाची सावली आपल्या सोबत असल्याचे त्यांनी
जाहीर केले. सेवानिवृत्त प्राचार्य अनंत हंबर्डे यांनी मी कायम धोंडेंसोबत होतो,
आहे आणि राहील असा विश्वास देत तालुका धोंडेंच्या कार्यासमोर कृतज्ञ आहे!
तुमच्यामुळे शेतकऱ्यांची मुले शाश्वत विकास आणि स्वावलंबी बनली असे सांगून भीमराव
धोंडे यांच्या गेल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा
घेतला.आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाला भीमराव धोंडे यांच्या नावाची गरज
आहे.एवढ्या ताकदीचे व्यक्तीमत्व मतदार संघात दुसरे नाही.शेतकरी आणि शिक्षण या दोन
महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माजी आमदार भीमराव यांचा श्वासोच्छ्वास आहे असे
ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले.आपण मतदार संघासाठी मोठे कार्य केले आहे
याचे फळ निश्चित मिळेल.सत्य सत्यच असते, सत्याचा विजय होत असतो असे ह.भ.प.विठ्ठल
महाराज शास्त्री यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना माजी आ.
भीमराव धोंडे यांनी सांगितले की,लोकसंख्येच्या तुलनेत आज प्रत्येक व्यक्तीला सरासरी
दोन ते तीन एकर जमिन मिळू शकते,भविष्यात ही परिस्थिती गुंठ्यांवर येईल त्यामुळे
शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करीत शेती पुरक उद्योग
उभारावेत. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राची ओळख निर्माण झालेली आहे.साधु संतांनी
देखील शेतीचे महत्व सांगितले आहे.शेतीवर प्रकाश टाकण्यासाठी कायमच वारकरी
संप्रदायाने काम केले डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील कामामुळे त्यांची
जगभरात ख्याती आहे. त्यांनी जादा उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाच्या
जातीचे संशोधन केले. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देखील एक हजार शास्त्रज्ञांना
कामाला लावून असे संशोधन करा की ज्यातून कमी पाण्यावर,कमी कालावधीत ज्यादा उत्पन्न
कसे मिळेल यासाठी काम करावे. पुढील दहा वर्षात सर्वच पिकांची उत्पादन क्षमता
वाढलेली दिसेल असे बियाणे भविष्यात येईल.कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीपूरक
व्यवसाय शेतकऱ्यांनी उभारावेत. महाराष्ट्राच्या अनेक भागातून कृषी प्रदर्शनासाठी
स्टॉल आले होते. राज्यातील सर्वात मोठा सांगली येथील खिल्लार जातीचा बैल देखील आला
होता.हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली या भावी पिढीला प्रदर्शनाचा
भविष्यात निश्चित फायदा होईल. आपला मतदारसंघ हा ऊस तोडणी कामगारांचा आहे. मला नेहमी
वाटते की आपल्या भागातील लोकांची ऊस तोडणी पासून मुक्तता होऊन त्यांचे भविष्य
चांगले झाले पाहिजे. यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो. शिक्षण क्षेत्रात थोडेफार काम
केलेले आहे. भविष्यात आणखी करायचे आहे आणि ऊसतोड कामगारांचे जीवन बदलण्यासाठी मी
सतत प्रयत्न करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठ परभणी अंतर्गत श्री. छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर,कृषी महाविद्यालय आष्टी
यांच्यावतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून २९
ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन
राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शनाचा गहिनीनाथगडाचे मठाधिपती ह.भ.प.विठ्ठल महाराज
शास्त्री व अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले
यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी आयोजक माजी आ. भीमराव धोंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुढे
बोलताना ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले की,सरकारी योजना कशा राबवाव्यात
हे महाराजांकडून शिकावे.कृषी क्षेत्रात स्वामिनाथन यांचे नांव लौकिक आहे.कृषी
प्रदर्शन पाहून शेतकऱ्यांची भावना बदलून अनेकांना कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी मत
परिवर्तन होईल. खेळ पैठणीच्या कार्यक्रमाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,
प्रत्येकाने एकदा तरी आपल्या सौभाग्यवतीला पैठणी घ्यावी. सर्वसामान्य लोकांना रोख
स्वरूपात मदत नको तर शिक्षणाच्या माध्यमातून भिमराव धोंडे मदत करतात. त्यांनी
शिक्षणासोबत नाळ जोडलेली आहे.युवानेते अजयदादा धोंडे यांच्या विषयी बोलताना बोधले
महाराज म्हणाले की,ते होतकरू युवा नेते आहेत त्यांना धोंडे हे नांव कायम पुढे
न्यायचे आहे.भविष्यात तुम्ही यशस्वी व्हाल असे आशिर्वाद दिले. ह.भ.प.विठ्ठल महाराज
शास्त्री यांनी सांगितले की,डॉ.स्वामीनाथन यांचे देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान
आहे. त्यांनी जादा उत्पन्न देणारे विविध पिकांचे वाण शोधून काढले. माजी आ.भीमराव
धोंडे यांनी गहिनीनाथगडाच्या दिंडीला सुरुवातीला श्री क्षेत्र अरण येथे दोन हजार
रुपये दिले होते.त्यानंतरच्या वर्षी केळीचा नाष्टा दिला आणि त्यानंतरच्या
वर्षांपासून ते गहिनीनाथगडाच्या दिंडीतील लाखों वारकऱ्यांना जेवण देतात.त्यामुळे
भीमराव धोंडे यांना गहिनीनाथ महाराज व वामनभाऊ यांचे आशिर्वाद आहेत.शेतकऱ्यांसाठी
दिल्लीपर्यंत पायी गेले.कृषी प्रदर्शनाची सर्वत्र चर्चा झाली आहे.आपण हे मोठे कार्य
केले आहे याचे फळ निश्चित मिळेल. सत्य सत्यच असते,सत्याचा विजय होत असतो. यावेळी
स्वागताध्यक्ष डाॕ. अजयदादा धोंडे यांनी सांगितले की,आपला भाग दुष्काळी आहे, यंदा
चांगला पाऊस झाला आहे.प्रदर्शनाच्या निमित्ताने निसर्गाने चांगली साथ दिली.
महिलांसाठी आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमास तीन हजारांवर महिलांनी हजेरी लावली.
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी धोंडेसाहेब विधानसभा
निवडणुक लढविणार आहेत त्यासाठी आपण सर्वांनी पाठीमागं उभे राहण्याची गरज
आहे.उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की, माजी आ. भीमराव धोंडे यांचा
स्वभाव सरळ आणि शांत आहे. काही लोक त्यांच्या शांत स्वभावाचा फायदा घेतात. हा
स्वभाव आता बदलावा आणि भविष्यात काहींची चा़ंगलीच जिरवा असे सांगितले.तालुका कृषी
अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले की,कृषी प्रदर्शनामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली
आहे. प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली.त्यांना नवनवीन माहिती
मिळाली.यातून शेतकरी समृद्ध होण्यासाठी मदत होईल माजी आ. भीमराव धोंडे यांनी
प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे चांगल्या प्रकारचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात
यावे.रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी भीमराव धोंडे यांचा भावी आमदार असा
उल्लेख केला.यावेळी कु. भक्ती गिरी या विद्यार्थ्यांनीने देखील उत्कृष्ट भाषण
केले.यावेळी शंकर देशमुख,डॉ.विश्वास मुळे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,उत्तम बोडखे,
आस्ताक शेख,हादी शेख,रघुनाथ शिंदे, बाबुराव कदम,विठ्ठलराव लांडगे, डॉ.मनोज पाचे,
माजी सभापती अनिल जायभाय, सदाशिव दिंडे, सेवानिवृत्त पीएसआय अन्सारभाई शेख,बबन
सांगळे,कुंडलिक आस्वर,कोंडीबा साबळे यांच्यासह संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.डी.बी.
राऊत,प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ, सर्व प्राध्यापक,सर्व प्रशासन अधिकारी, शेतकरी व
कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना
प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ यांनी सांगितले की,एक लाख तीन हजार शेतकऱ्यांनी भेटी
दिल्या.आष्टी तालुक्यातील सुमारे ५५ शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भेटी
दिल्या तसेच जवळपास १० कोटी रुपयांची उलाढाल झाली.त्याचप्रमाणे चार ट्रॅक्टर व एक
फवारणीचे ब्लोअर विकले गेले.विविध प्रकारचे एकुण ११० स्टाॅल सहभागी झाले होते.
स्व.बापुराव धोंडे या़च्या स्मरणार्थ कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या
शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे व
प्राचार्य बाळासाहेब खेमकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.पी.आर. काळे यांनी
मानले.
************************-
0 टिप्पण्या