आष्टी (प्रतिनिधी)
दिड महिन्यानंतर नागपूर येथील वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी
तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला.आष्टी येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची बदली
झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती मिळालेल्या तहसीलदार वैशाली नेमगोंडा पाटील
गेल्या दिड महिन्यांपासून रुजू न झाल्याने आष्टी तहसीलदारचे पद रिक्त होते.यामुळे
अनेकांची कामे खोळंबली होती. जनतेची मोठी गैरसोय होत होती.शुक्रवारी दुपारी नागपूर
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी
तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला.आष्टी तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुन भगीरथ धारक
यांच्यासह आष्टी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संतोष जंपलवार,
पदाधिकारी, माजी सरपंच सतीषशेठ धस,माजी सरपंच रामशेठ मधुरकर, संजयनाना ढोबळे,माजी
सरपंच गंगा पाटील सिरसाट, रामकृष्ण वाळेकर,अनिल माळशिखरे,डी.एन. आंधळे,नवनाथ
अगाशे,बबन तळेकर, अरुण बळे,गणगे दुकानदार,लक्ष्मण खाडे आदिंनी नवीन तहसिदार वैशाली
पाटील नेमगोंडा यांचे स्वागत केले.
0 टिप्पण्या