आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील चिखलीचे प्रगतशील शेतकरी बबनदादा शिंदे
यांच्या ड्रॅगन फ्रुट फळबागेला तालुका
कृषी अधिकारी गोरख तरटे वा पत्रकारांनी भेट दिली.चिखली येथे जागृत देवस्थान महालक्ष्मी यात्रेनिमित्त
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी प्रगतशील शेतकरी बबनदादा शिंदे यांच्या
राजे संभाजी उद्योग समूहाचे स्नेहभोजनचा कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्ताने आष्टी तालुक्यातील चिखली येथील शेतीनिष्ट शेतकरी 'समाजसेवक' बबनदादा शिंदे यांच्या ड्रॅगन फ्रुट फळबागेला तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,कृषी सहाय्यक यांनी
भेट देऊन फळबागेची पाहणी केली यावेळी युवा नेते शाम धस,राजे संभाजी उद्योग समूहाचे संचालक अमोलराजे शिंदे,महेश हंबर्डे,उत्तम बोडखे,प्रवीण पोकळे, शरद रेडेकर,संतोष सानप,सचिन रानडे यांच्यासह आदि विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या