
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यासह शहरात झाडांची संख्या कमी आहे. त्यामागे अनेक
कारणे आहेत.पण केवळ कारणे शोधून त्यामध्येच अडकून पडण्यापेक्षा वृक्षारोपणावर भर
दिला पाहिजे कारण झाडे जगली तरच आरोग्य,पर्यावरण संतुलित राहणार आहे.खरे तर झाडे
लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा
वृक्षारोपनात सहभाग आवश्यक आहे.झाडे जगली तर आपण व आपली पुढची पिढी जगणार आहे असे
प्रतिपादन आष्टी नगरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डाॕ.विलासराव सोनवणे यांनी केले.
आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलासराव सोनवणे यांच्या वाढदिवसाचे
निमित्ताने आष्टी तालुक्यातील बेलगांव ग्रामस्थ व आष्टी नागरी पतसंस्थेच्यावतीने
रेणूकामाता मंदिर परिसरात वड,पिंपळ,गुलमोहर यासह अनेक १०१ वृक्षाचे वृक्षारोपण
शनिवार दि.२३ आॕगस्ट रोजी सकाळी १० वा.करण्यात आले. बेलगाव येथील जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा आणि अंबिका विद्यालयातील १२० विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व
पेन,शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सामाजिक उपक्रम राबवत डॉ.विलासराव सोनवणे यांचा
वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अॕड.निर्मला सोनवणे,पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन
नवनीतशेठ कटारिया, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,डॉ. प्रकाश झांजे,बेलगांवचे
सरपंच तात्यासाहेब शिंदे,उपसरपंच सतिष पोकळे, अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक सतिष
जेवे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, डॉ.नदिम शेख,माजी सरपंच
बन्सीभाऊ पोकळे,युवानेते अशोक पोकळे, माजी सरपंच बन्शीभाऊ पोकळे,जेष्ठ पत्रकार
सीताराम पोकळे,भीमराव गुरव, सचिन रानडे, गणेश दळवी,ईश्वर पोकळे,माजी उपसरपंच संजय
पोकळे,कैलास पोकळे, अमृत पोकळे, पतसंस्थेचे शाखाधिकारी काकासाहेब पोकळे,प्रशांत
पोकळे, आनंद शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.सोनवणे म्हणाले
की,अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा प्रमाणेच ऑक्सिजनची देखील तेवढी गरज
आहे.झाडांमुळे घर,बंगल्याचे सौंदर्य खुलते.एक प्रकारचा टवटवीतपणा जाणवतो.हीच बाब
शहरासाठीही लागू आहे.ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे असतात तेथील
नागरिकांच्या चेह-यावर तजेलदारपणा असतो.युरोपमधील अनेक शहरांत वृक्षारोपणावर विशेष
लक्ष दिले जाते. त्याचे कारणच तेथील नागरिकांमधील जागरुकता हे असावी.भारतात अलीकडील
काळात वृक्षारोपणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे.पण त्याचेप्रमाण अपेक्षेइतके
नाही. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होणा-या मोहिमांचा अपेक्षित फायदा होत
नाही.हे लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे तरच झाडे जगतील.बेलगाव
ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि गौरव केला. १९८३ पासून या बेलगावाने
मला खूप दिल आहे.माझ्या डॉक्टर म्हणून जनसेवेची सुरुवातच मी बेलगाव या गावातून केली
आहे. या गावाने मला भरभरून प्रेम दिलेले आहे.अतिशय जिव्हाळ्याचे संबंध या गावाशी
माझे सुरवातीच्या काळापासून राहिले आहेत. माझा वाढदिवस ग्रामस्थांनी साजरा केला
असल्याने मनाला समाधान लाभले आहे असेही डाॕ.सोनवणे म्हणाले. यावेळी पतसंस्थेचे
शाखाधिकारी काकासाहेब पोकळे यांची कन्या विद्यार्थी कु.अंकिता हिने आष्टी नागरी
पतसंस्थेबद्दल माहिती आणि डॉ.विलासराव सोनवणे यांच्या जीवन कार्याबद्दल अतिशय
मुद्देसुदपणे प्रभावी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक शिंदे
यांनी तर आभार सीताराम पोकळे यांनी मानले.
0 टिप्पण्या