
आष्टी (प्रतिनिधी) स्व.ल.रा.देशमुख तथा तात्यासाहेब देशमुख यांचा २८ वा. स्मृतिदिन २७ जुलै २०२४ रोजी पुणे येथे होत आहे प्रामाणिकपणे निष्ठेने काम करीत आहे अशा व्यक्तीचा गुणगौरव केला जातो यावर्षी ॲड.डॉ.अरुण जाधव हे जामखेड शहरातील तरुण युवा व्यक्तिमत्व आहे.अरुण जाधव यांनी आजपर्यंत वंचित समाज,अप्रगत विद्यार्थी, कमी उत्पन्न असलेले लोक विविध क्षेत्रातील मजूर यांची सामाजिक आर्थिक बौद्धिक नैतिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या कार्याला यशही मिळत आहे. त्यांची पध्दती पाहून हे कार्य त्यांचं अधिक जोमाने वाढावे म्हणून या पुरस्कारासाठी अरुण जाधव यांची निवड केलेली आहे. तात्यासाहेब देशमुख हे जामखेडचे रहिवासी होते. त्यांचे परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती त्यामुळे या पुरस्काराला जामखेड तालुक्यामध्ये विशेष महत्त्व आहे यावर्षीचा हा पुरस्कार प्रसिद्ध कवी आणि गझलकार श्री हिमांशू कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे येथे २७ जुलै रोजी दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अरुण चिंतामणी शशी देशमुख,राजाभाऊ मोरे तसेच ॲड.अरुण जाधव यांचे काही सहा अध्यायी, सहयोगी उपस्थित राहणार आहेत जामखेडचे पुणे येथील रहिवासी या कार्यक्रमाला दरवर्षी आवर्जून येतात अशी माहिती डॉ.अ.ल. देशमुख यांनी दिली.
0 टिप्पण्या