Ticker

6/recent/ticker-posts

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमध्ये डॉज बॉल या खेळाचा समावेश होण्याची आवश्यकता .......................... प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे

आष्टी (प्रतिनिधी) सन २००७ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये डॉजबॉल या क्रीडा प्रकाराची सुरुवात आपण केली असून सन २००९ पासून शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या डॉज बॉल खेळाचा समावेश करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाचा समावेश होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांनी केले. आष्टी येथे बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आणि आष्टी येथील भगवान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे उद्घाटक युवा नेते जयदत्त धस, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष अॕड.वाल्मीक निकाळजे, समाजसेवक विजय गोल्हार,आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजि.किशोर हंबर्डे, श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे,बीड जिल्हा डाॅजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अॕड.बाबुराव अनारसे,सचिव प्रा.डॉ.सुनील पंढरे भगवान महाविद्यालयाचे प्रा.दीपक टेकाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे म्हणाले की,सन २००९ पासून शालेय आणि डॉजबॉल असोसिएशनच्या सब ज्युनिअर जूनियर आणि सीनियर या सर्व वयोगटांमध्ये डॉजबॉल क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असून त्यामुळे या खेळाचा महाराष्ट्र राज्यामध्ये वेगाने प्रसार झाला असून या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघ सतत राष्ट्रीय पातळीवर विजेता किंवा उपविजेता राहिलेला आहे सन २०१७ पासून महाराष्ट्र शासनाने या डाॅजबॉल क्रीडा प्रकारास अनुदानित केले आहे.दि ७ जुलै २०२३ रोजी बँकॉक थायलंड येथे झालेल्या आशियाई ऑलिंपिक स्पर्धेमध्ये या डॉजबॉल खेळाचा समावेश झाला असून यापुढे आता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाचा समावेश होण्याची आवश्यकता आहे तसेच या डॉजबॉल राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या विजेत्या संघाच्या खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेमध्ये ०५ टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी आमची मागणी असून लवकरच अशा प्रकारचा अनुकूल निर्णय येण्याची शक्यता असल्याचे सांगत या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेता संघ ४ ते ८ जुलै २०२४ दरम्यान होणाऱ्या मंडी हिमाचल प्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले सन २०१७ क्वाललंपूर, मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये आपण भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.नुकत्याच २१ जानेवारी २०२४ मध्ये सौदी अरेबिया मधील रियाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील.स्वीकार रणजीत हरगुले आणि संस्कार रणजीत हरगुले या दोन सख्ख्या भावांनी अत्यंत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करून भारतीय संघामध्ये स्थान मिळवले. अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले प्रास्ताविक करताना बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबुराव अनारसे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील विशेषतः आष्टी तालुक्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवले असल्याने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद बीड जिल्ह्याला मिळाले असून आष्टी येथे स्पर्धा आयोजित करण्याची संधी आपणास मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी या स्पर्धेचे उद्घाटक युवा नेते जयदत्त धस यांनी आष्टी तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्या मध्ये अनेक क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण झाले आहेत असे सांगितले.खेळाडूंना मार्गदर्शन करताना ॲड.वाल्मीक निकाळजे यांनी डॉजबॉल हा क्रीडा प्रकार मूलतः दक्षिण आफ्रिकेतील असून त्याकाळी दगड विटांनी हा खेळ खेळला जात असे आता त्यामध्ये सुधारणा होऊन आता चेंडू वापरला जात असल्याचे सांगत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारत देशातील क्रीडा क्षेत्रामध्ये चैतन्य निर्माण झाले असून विविध खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे त्याचा आदर्श खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना इंजि.किशोर हंबर्डे म्हणाले की, अॕड.बी.डी. हंबर्डे महाविद्यालयातील विद्यार्थी सचिन धस याने १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर यश प्राप्त केले असून आष्टी येथील सईद चाऊस आणि करमाळा येथील बाला रफिक शेख हे दोन खेळाडू महाराष्ट्र केसरी झाले आहेत असा दैदिप्यमान इतिहास आष्टी तालुक्याला लाभलेला आहे असे सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेले स्वीकार हरगुले आणि संस्कार हरगुले या भावंडांचा आणि सर्व जिल्ह्यांचे सचिव यांचा सत्कार करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर आणि प्रा.डाॕ. सूर्यकांत धोंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या