



आष्टी ( प्रतिनिधी )
'संत हे जगाचे उद्धारक असतात; किंबहुना समाजाला योग्य दिशा
देण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जाते. स्वतः प्रचंड कष्ट,अपमान सहन करत
इतरांच्या जीवनात आनंद निर्मितीसाठी आयुष्य कर्म करणारे ते असतात, असे सांगून
संतांचे केवळ एक वचन मानवी जीवनाचे दुःख घालू शकते.नर्मदा परिक्रमा ही
आत्मबोध,वैराग्य प्राप्तीसाठी असावी असे प्रतिपादन अध्यात्मक क्षेत्रातील नामांकीत
कीर्तनकार ह.भ.प.डाॕ.विकासानंद महाराज शास्त्री मिसाळ यांनी केले. आष्टी
तालुक्यातील केळसांगवी येथे पायी नर्मदा परिक्रमाबद्दल हरिकीर्तन सेवा संपन्न झाली.
यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,माजी आ.भीमराव धोंडे,ॲड. चंद्रकातभाऊ आजबे,तात्या
महाराज, सतीशआबा शिंदे,ह.भ.प.आदिनाथ दानवे महाराज,ह.भ.प.अशोक बळे महाराज,ह.भ.प.मोहन
महाराज आमटे, ह.भ.प.तावरे टेलर महाराज,विठ्ठलराव बन्सोडे,विक्रम पोकळे,जेष्ठ
पत्रकार उत्तम बोडखे,सरपंच पंडीत पोकळे, दिलीप काळे,गौतम आजबे,माजी सभापती
काकासाहेब थेटे,बबनराव पडोळे,रोहिदास कर्डीले महाराज, नानासाहेब तवले
महाराज,सेवानिवृत्त उपअभियंता पी.ई.तळेकर आप्पा, भाऊसाहेब गाडे,सुभाष सोनवणे,
विश्वनाथ चांगुणे महाराज,अशोक लटपटे सर,सुभाष बोरुडे आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवर होते. यावेळी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर अत्यंत
अभ्यासपूर्वक निरूपण करताना कीर्तनकार ह.भ.प.डाॕ.विकासानंद शास्त्री मिसाळ अत्यंत
रसाळ वाणीतून उपस्थित रसिक जणांना मार्गदर्शन करीत होते.नर्मदा परिक्रमेने तर पुण्य
मिळतेच परंतु नर्मदा स्नान केल्याने, नर्मदेचे नामजप केल्याने नव्हेनव्हे नर्मदेचे
स्मरण केल्याने देखील पुण्य प्राप्त होत असते.रडण दुःखामुळे असतं दुःख पापामुळे
असतं.परमार्थात रडणं हे पुण्यामुळे असते.संसारात रडणं पापचं फळ,तर परमार्थात रडणं
अनेक जन्माचे पुण्य असते असेही ह.भ.प.डाॕ. मिसाळ महाराज म्हणाले.यावेळी राजकीय
सामाजिक सांस्कृतिक आणि अध्यात्म क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प.डाॕ.विकासानंद शास्त्री मिसाळ पुढे म्हणाले की,मानवी जीवनात सुख आणि दुःख या
दोन गोष्टी अपरिहार्य आहेत.समाजहिताच्या भल्यासाठी सातत्याने स्वतःचे दुःख लपवून
निश्चयी भावनेने पुढाकार घेऊन कर्तव्य कर्म करतात ते संत महत्त्वाचे आहेत.संतांच्या
विचार कार्यावर चालणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य असून पायी नर्मदा परिक्रमा ही
भविष्यातील शाश्वत विकास धोरणाची अत्यंत रास्त भूमिका आहे.संत सज्जनांनी गेल्या
शेकडो वर्षापूर्वी संत वचनांच्या माध्यमातून मार्गदर्शिका आजही पुरेपूर लागू पडते
ही त्यांच्या प्रचंड ज्ञानगाथेचे वास्तविकता आहे.यावेळी परिक्रमावासी
ह.भ.प.पांडुरंग महाराज भालके केळसांगवीकर, परिक्रमावासी मोहन घुले (माजी सरपंच
केळसांगवी) यांच्यासह ज्येष्ठ कीर्तनकार आणि समाजधुरिन उपस्थित होते.केळसांगवी येथे
ह.भ.प.भागवताचार्य डॉ.विकासानंद महाराज मिसाळ यांचे केळसांगवी येथील महादेव मंदिर
आवारात झालेले कीर्तन संस्मरणीय ठरले.याप्रसंगी पायी नर्मदा परिक्रमा घडल्याबद्दल
नर्मदा मैय्या जलपूजन, कन्यापूजन, ज्ञानदान,अन्नदान सोहळा पार पडला.रविवारी २६ मे
रोजी केळसांगवी येथे हा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.
ह.भ.प.भागवताचार्य डॉ.विकासानंद महाराज मिसाळ (पिंपळगाव वाघा- अहमदनगर) यांची
सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली.यावेळी राजकीय, सामाजिक,धार्मिक, वैचारिक,शैक्षणिक,
विविध क्षेत्रातील समाजधुरीन,ज्येष्ठ नागरिक,महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी मनोगत व्यक्त
केले.यावेळी उपस्थितांचे सरपंच अजित घुले यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या