
आष्टी ( प्रतिनिधी )
माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे कार्य मोठे आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या असल्याने एक फार मोठा सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा चालवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे.यापूर्वी या बाबीचा अनुभव जिल्ह्याने घेतला आहे. त्या दृष्टीने येत्या मतदानादिवशी आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून मतदान रुपी प्रचंड ताकद त्यांच्या पाठीमागे उभा करू असा विश्वास आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला.
नुकतेच माजी आ. भीमराव धोंडे यांचे कनिष्ठ बंधू यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालेले आहे असे प्रचंड दुःख पोटात घालून त्यांनी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या निवडून येण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आणि गाव गावच्या कार्यकर्त्यांशी सातत्याने चोवीस तास संपर्क ठेवून मतदान करण्याची विनंती सुरूच ठेवली आहे.
आज पत्रकार परिषदेमध्ये तालुक्यातील विविध पत्रकार आणि विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना आणि प्रश्नाला उत्तर देताना माजी आमदार भीमराव धोंडे अत्यंत पोटतिडकीने बोलत होते.माजी आमदार भीमराव धोंडे पुढे म्हणाले की,जास्तीत जास्त मतांनी पंकजाताई मुंडे यांना निवडून द्यावे यासाठी गावोगाव प्रचार दौरा सर्व कुटुंबातील सदस्यांनी सुरू केलेला आहे.दोन महिन्यांनपसून माझा प्रचार सुरू आहे तिघेही एकत्र आहोत.त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. किती मते जास्तीचे वाढविता येतील यासाठी प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत. माजी आ.
अमरसिंह पंडित,पालकमंत्री,
प्रकाश सोळंके आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी हे एकत्र आल्याने त्यांची ताकद किती आहे. हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.१० टक्के आरक्षण सरकारने दिले असल्याने सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे यावरून दिसून येत आहे.आष्टी मतदारसंघात ७० ते ७५ हजाराची लीड मिळेल असा ठाम विश्वास निर्धारही माजी आ.भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे बीड जिल्ह्याचे विकास कामांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचे नाव देश पातळीवर पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा त्यांना आजचे मताधिक्य देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असेही आवाहन शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला केले.
बीड लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे आष्टी विधानसभा मतदार संघाचा विचार करता भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा सदस्य आ. बाळासाहेब आजबे असे आम्ही तिघेही एकत्र आहोत.त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आहे मागील निवडणुकीमध्ये, , , , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुतीमध्ये नसताना देखील १ लाख ७१ हजार मतांनी डॉ.प्रीतमताई मुंडे विजयी झाल्या होत्या.यावेळी आता बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्गज नेते महायुतीमध्ये आल्यामुळे मागील निवडणुकीतील मताधिक्यापेक्षा यावेळी आणखी कितीमते जास्तीचे वाढविता येतील यासाठी प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत.गेवराई तालुक्यातून अमरसिंह पंडित,परळी तालुक्यातून पालकमंत्री धनंजय मुंडे, माजलगावातून आ.प्रकाश सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी पार्टी हे एकत्र आल्याने त्यांची ताकद किती आहे ? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. मराठा समाजाला महायुती शासनातील मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाने विधानसभेमध्ये ठराव पारित करून १० टक्के आरक्षण सरकारने दिले असल्याने सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे यावरून दिसून येत आहे.रासायनिक खतांच्या वाढत्या किमती बाबत बोलताना ते म्हणाले की,युक्रेन रशिया युद्धामुळे देखील कच्च्या मालाच्या किंमती कमी
जास्त होत असल्यामुळे खताच्या किंमती वाढत आहेत असे सांगत आष्टी तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी गेले २० वर्ष सत्तेत राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता करत आहेत याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता उल्लेख केला.मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ.प्रीतमताई मुंडे यांना १ लाख ७१ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते आता या निवडणुकीमध्ये आष्टी मतदार संघात. ७० ते ७५ हजाराची लीड मिळेल.असा आपला राजकीय अंदाज आहे.त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले..
चौकट
---------
'कौटुंबिक दुःख गिळून पंकजाताईसाठी
माजी आ.भीमराव धोंडे रस्त्यावर!'
---------------------------------
आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे सातत्याने समाजाभिमुख कार्य करण्यात अग्रेसर असतात.कुठल्याही कामाची जाहिरात न करता कामात मग्न असतात.त्याचा अनुभव नुकताच पाहण्यास मिळत आहे. यांचे कनिष्ठ बंधू बापूराव धोंडे यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झालेले आहे घरात संपूर्ण दुःखाचे वातावरण आहे.अशाही परिस्थितीत पंकजाताई मुंडे यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भरघोस मताधिक्य मिळावे आणि पंकजाताई निवडून याव्यात यासाठी माजी आ.भीमराव धोंडे कौटुंबिक दुःख घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.त्यांनी आज सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नियोजनाला वाट मोकळी करून दिली.पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पंकजाताई मुंडे नक्की निवडून येतील आणि प्रचंड ताकतीने आम्ही त्यांना देशात नंबर एकच्या मताधिक्याने निवडून आणू हा विश्वास दिला.माजी आ.भीमराव धोंडे हे पंकजाताईसाठी जिवाचे रान करीत आहेत.
0 टिप्पण्या