Ticker

6/recent/ticker-posts

नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीने सीएचबी प्राध्यापकांचे शोषण थांबून शंभर टक्के प्राध्यापक भरतीकरता पुणे महसंचालक कर्यालयासमोर करणार सत्याग्रह आंदोलन

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात उच्च शिक्षण क्षेत्रातील ढासळत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात दर्जेदारपणे - परिणामकारक लागू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (U.G.C.) आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १०० टक्के प्राध्यापक पदभरती होणे गरजेचे आहे.उच्चशिक्षित नेट-सेट, पीएच.डी.पात्रता धारकांच्या रोजगाराशी निगडीत असणाऱ्या या मूलभूत प्रश्नाच्या निराकरणासाठी नेट-सेट,पीएच.डी धारक संघर्ष समितीने सत्याग्रह, उपोषणे,अन्नत्याग,धरणे आंदोलने, पदयात्रा आदि सर्व संवैधानिक तथा घटनात्मक मार्गाचा अवलंब करून देखील त्याकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सरकारला आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ४ जूनपासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन पुकारले आहे. खालील प्रमुख मागण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने आता आर पारची लढाई असे आंदोलन केले जाणार आहे. नेट-सेट,पीएच.डी. संघर्ष समितीच्यावतीने पुणे येथे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने ५ जून पासून केला जाणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनचे निवेदन सादर करण्यात आले. केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार १०० टक्के प्राध्यापक भरती करणे,केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार तासिका तत्त्व (CHB) धोरण बंद करुन 'समान काम समान वेतन' लागू करणे,सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे,विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करणे या आमच्या मागण्या असल्याचे आहेत. राज्यसमन्वयक डॉ. प्रमोद तांबे,डॉ.ईश्वर मस्लेकर यांनी सांगीतले. *चौकट* --------------- नवीन शैक्षणिक धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तासिका तत्त्व प्राध्यापक (CHB) प्रणाली बंद करुन केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार १०० टक्के पूर्णवेळ प्राध्यापकाची भरती करावी.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होऊन त्यावर शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील या आमच्या रास्त मागण्या आहेत. ----- प्रा. डॉ.रमेश वाघमारे (नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य) ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या