Ticker

6/recent/ticker-posts

समाजाने शिक्षकांच्या आर्थिक संपन्नतेकडे न पाहता; त्यांच्यातील ज्ञानसंपन्नता पाहावी! ...................... लक्ष्मणराव खकाळ यांच्या सेवाकालाचे फलित ................. सुप्रसिद्ध वक्ते संजय कळमकर

,
आष्टी (प्रतिनिधी) , " शिक्षक हा समाज,देश आणि राष्ट्राचा दिशादर्शक असतो;किंबहुना व्यवस्थेतील हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून त्याला सन्मान असला पाहिजे असे सांगत शिक्षकाची केवळ आर्थिक संपत्ती बघू नका त्याने केलेले ज्ञानदायी कार्य अध्यापन कर्तव्य, आणि ज्ञानसंपन्नता पहावी" असा मौलिक सल्ला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते विचारवंत संजय कळमकर यांनी दिला. दरम्यान,आपल्या तीन दशक सेवेनंतर आदर्श शिक्षक लक्ष्मणराव खाकाळ गुरुजींनी यशस्वीरित्या सेवानिवृत्तीचा काळ शाळेच्या ज्ञान मंदिरात विद्यार्थी घडवण्यासाठी केल्याने त्यांच्या सेवाकालाची यशस्वी फलश्रुती आहे!' असा गौरवही त्यांनी केला. मुख्याध्यापक खाकाळ सर यांनी आपल्या सेवेकाळात आदर्श विद्यार्थ्थी घडविले आहेत त्याचबरोबर आपले पाल्याही उच्च शिक्षीत केलेले आहेत.त्यांना प्रमाणिकपणा व कर्तव्याप्रति निष्ठा कामी आली आहे.त्यांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा बीड जि.प.चे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी दिल्या. आष्टी तालुक्यातील आदर्श शिक्षक,शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व केळसांगवीचे मुख्याध्यापक लक्ष्मणराव खाकाळ (बापु) सर हे आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विविध शैक्षणिक,सामाजिक, उपक्रमांची रेलचेल झाली.दरम्यान मार्गदर्शनासाठी विशेष निमंत्रित असलेले विचारवंत संजय कळमकर यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिराळ येथील शाळेचे मुख्याध्यापक संतोष दाणी यांनी केले. अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,शिक्षक नेते संजय कळमकर,ज्योती क्रांती बँकेचे चेअरमन आजिनाथ हजारे, पत्रकार उत्तम बोडखे, दशरथ हजारे,अशोक जरे,शेकटकर मॕडम, माजी चेअरमन सुरेश पवार,महेश शिंदे,सरपंच अजित घुले,माजी सरपंच गंगाधर पडोळे,विकास म्हेत्रे,कवी हरिष हातवटे, अशोक लटपटे,सिध्देश्वर शेंडगे,सुभाष भादवे, त्रिबंक दिंडे,रोडे, दिगांबर वाळके,सोमनाथ वाळके,अशोक सासवडे, लवांडे सर आदिसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जगन्नाथ भगत,ताहेर शेख,जावेद इनामदार, जया चौधरी मॅडम, गीता शेकडे,पुनम येवले,आशा ठाकर व शिराळ केंद्रातील सर्व शिक्षक बंधू यांनी केले. संजय कळमकर पुढे म्हणाले की,लक्ष्मणराव खकाळ गुरुजींचे यश, आनंद केवळ त्यांच्या प्रमाणिकपणे केलेल्या सेवाकालाचे फलीत आहे.शिक्षक हे वाचक आहेत परंतु ते गावभर फिरुन टपरीत, हाॕटेलमध्ये वर्तमानपत्र वाचतात.त्यांनी वर्तमानपत्र घरी घ्यावे. घरातील पाल्य, कुंटुंबातील सदस्य वाचतील.शिक्षकांनी ज्ञानसमृध्द असले पाहिजे.समाज फक्त शिक्षकांकडे अपेक्षेने पाहातो आहे.समाज संपन्न होत गेला तसा तसा शिक्षक संपन्न होत गेला आहे.समाजाने शिक्षकांच्या आर्थिक संपन्नतेकडे न पाहता त्यांच्यातीला ज्ञानसंपन्नता पाहावी असेही यावेळी संजय कळमकर यांनी सांगीतले.प्रमुख वक्ते म्हणुन कळमकर यांनी विनोदी भाषाशैलीने विविध क्षेत्रातील उपस्थितांना तब्बल दोन तास खिळवून ठेवले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी हरीश हातवटे,विकास म्हेत्रे यांनी तर आभार विकास धस यांनी मानले. ------------------- *चौकट* --------- *शिक्षण विभागाने चिंतन करावे!* ---------------------------- पुर्वी शिक्षक सेवानिवृत्त होताना शिक्षकांना वाईट वाटायचे..आजकाल शिक्षक सेवानिवृत्त होताना सुटल्यासारखे का वाटते ? याचा विचार शिक्षण विभागाने करावा? अशा भावना कळमकर यांनी उपस्थित शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्या. *शिक्षणाशिवाय अवांतर कामे अधिक!* ------------------------------ ज्ञानवंत शिक्षकांना विद्यार्थ्थीसमोर कीती वेळ अध्यापनास दिला जातो.हे तपासण्याची गरज आहे.शैक्षणिक कामाशिवाय अवांतर कामे वाढत आहेत.खरं पाहिले तर शिक्षकांशिवाय कोणीही ते चांगल्या प्रकारे काम करु शकतात. *देव आणि शिक्षक समान!* ----------------------- देव मनुष्याला कर्मानुसार फळ देतो.समाजाचा रक्षक म्हणून शिक्षक आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतो.योग्य दिशा देण्याचे, संस्कार करण्याचे मौलिक कार्य त्याच्याकडून होत असते. साक्षात देव आणि शिक्षक समान मानले तर अतिशयोक्ती होऊ नये. ******************** *प्रमाणिकपणे नोकरी; मुले झाली उच्चपदस्थ!*------------------------------ सत्काराला उत्तर देताना खाकाळ सर भाऊक झाले.नाजुक अशी कौटुंबिक परिस्थिती असताना जिद्दीने, अडचणींना तोंड देत शिक्षण घेतले.शिक्षण घेताना मित्रपरिवाराचे सहकार्य झाले.वाहिरा येथे शिक्षक म्हणुन प्रथम नेमणुक झाली होती. लोणी सय्यदमीर १८ वर्षे सेवाकाल गेला.साकत येथे काही काळ ,हिवरा ५ वर्षे सेवाकाल गेला. सेवापूर्तीपर्यत केळसांगवी येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्य केले आहे.नौकरी प्रमाणिकपणे केल्याने मुले,मुली उच्च पदस्थ बनलेले आहेत.पत्नीने आयुष्यात खुप साथ दिली.सोनाली खाकाळ ही मुलगी आहे.तीन्ही मुले इंजिनिअर झालेले आहेत. *मुलीच्या पहिल्या पगारातून पुस्तकांची ग्रंथतुला!* ---------------------------- मुलीच्या पहिल्या पगाराच्या पैशातुन खाकाळ बापु यांंच्या वजनाईतके ग्रंथालयीन उपयोगी पुस्तके सेवाकाळात आलेल्या पाच शाळांना पाच संच करुन भेट दिले. ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या