
आष्टी ( प्रतिनिधी )
'...पोटाला चिमटा घेऊन आपल्या सर्वसामान्य अत्यंत नाजूक आर्थिक
परिस्थितीला सामोरे जात मुलीने खूप शिकले पाहिजे..चांगल्या पदावर गेले पाहिजे.. हे
स्वप्न बाळगत मुलीला शिक्षण दिलेल्या कडा सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त
कर्मचारी बाबासाहेब गर्जेंच्या स्वप्नांच्या अखेर पूर्तता झाली.लाडकी लेक सोनालीची
थेट फौजदार पदावर निवड झाल्याने आई-वडिलांना अक्षरशः आकाश ठेंगणे झाले आहे! आष्टी
तालुक्यातील नागतळा या अत्यंत डोंगराळ भागातील छोट्याशा गावातील बाबासाहेब गर्जे हे
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या कडा सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त
कर्मचारी आहेत.तर त्यांच्या पत्नीसौ.आशाबाई बाबासाहेब गर्जे या माजी आ.भीमराव धोंडे
यांच्याच शिक्षण संस्थेत सेविका म्हणून कार्यरत आहेत.या उभय पती- पत्नी यांनी
आपल्या मुलांना अत्यंत गरीब सर्वसामान्य परिस्थितीतून उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न
केला.विशेषतः मुलगी सोनाली हिने सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती कुटुंबाची असतानाही
रात्रंदिवस पुस्तकांचा ध्यास घेत अभ्यास केला.स्पर्धा परीक्षेसाठीची तयारी करत तिने
२०२१ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा दिली.ही परीक्षा पास झाल्यानंतर
फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलाखत झाली.नुकतीच सोनालीची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवाड
झाली आहे. सोनलीचे प्राथमिक पहीली ते चौथीपर्यत जि.प.प्रा.शाळा कडा साखर कारखाना
येथे झाले.पाचावी ते दहावीपर्यत जयभवानी विद्यालय जळगाव येथे तर अकरावी ते बी.एस्सी
पर्यत आष्टी येथील भगवान महाविद्यालयात शिक्षण झाले.पदवी मिळाल्यानंतर पाच वर्षे
पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी व क्लास केला. आज हे यश मिळाले आहे.पोलिस
उपनिरीक्षक ( फौजदार ) पदावर निवड झाल्याबद्दल सोनाली गर्जेचे तालुक्यातील विविध
शिक्षण प्रेमी राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडुन
विशेषतः माजी आ. भीमराव धोंडे,नियामत बेग,साहेबराव म्हस्के, आण्णासाहेब चौधरी,
एन.टी.गर्जे,श्रीरंग कर्डीले ,छगन तरटे,उत्तम बोडखे, माजी सभापती लक्ष्मण
नन्नवरे,रामदास फौजी सोनवणे,विष्णू दहिफळे,संजय मिसाळ, बापुराव आव्हाड,सरपंच अभय
गर्जे,सरपंच बाबा गर्जे,बाळु वनवे,विठ्ठल गर्जे,शिवाजी गर्जे,मच्छिंद्र वायभासे
आदिंनी अभिनंदन केले. सोनाली गर्जे हीची फौजदार पदावर निवड झाली आहे.ही बातमी कळताच
आष्टी तालुक्यातील नागतळा येथे अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. एका गरीब,होतकरू
सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आपल्या जिद्द चिकाटी परिश्रम मेहनत आणि कष्टाच्या
बळावर खाकी वर्दीत अधिकारी पदावर पोहोचली.याचा आनंद सुगंधापरी दरवळत राहिला.
दरम्यान,आई-वडिलांनी प्रचंड मेहनत घेऊन शिपायासारख्या अत्यंत सामान्य सेवेमध्ये
प्रमाणिक कष्ट आणि कर्तव्य बजावत मुलीला स्पर्धा परीक्षेतून उच्च पदावर
पोहोचवले.याची प्रेरणा घेऊन आष्टी तालुक्यातील अनेक मुलींचे पालक शिक्षणाविषयी
अनुकूल झाल्याचे चित्र दिसत आहे.
0 टिप्पण्या