आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बावी येथील पोलीस हनुमंत कावळे यांचे भाऊ व
आण्णासाहेब कावळे आणि बाबासाहेब उर्फ पप्पु कावळे यांच्या मुलांना राज्यस्तरीय
प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळाले आहे.बावी येथील कावळे वस्तीवरील दोन विद्यार्थ्यांनी
राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.कु.समाधान आण्णासाहेब
कावळे इ.सहावी ३०० पैकी २४४ गुण मिळवून राज्यात १६ वा. क्रमांक पटकावला आहे.कु.मयुर
बाबासाहेब कावळे इ.चौथी याने बीड जिल्ह्यातुन १६ वा.क्रमांक मिळवला आहे.या यशाबद्दल
आनेकांनी अभिनंदन केले. स्वामी विवेकानंद विद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. दि.१६
एप्रिल रोजी यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे.
0 टिप्पण्या