Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी शहरात उद्या अहिंसा याञेचे आगमन; आचार्य श्री महाश्रमणजींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ............................. सकल जैन समाजाचे आवाहन*

आष्टी आष्टी (प्रतिनिधी) जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संप्रदायाचे अकरावे आचार्य युगप्रधान श्री महाश्रमाणजी यांच्या अहिंसा यात्रेचे उद्या शुक्रवारी दि.१९ एप्रिल रोजी आष्टी येथे आगमन होणार आहे.या कार्यक्रमाचा सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यात प्रथमच आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेचे आगमन होत आहे. त्यांच्यासोबत १०० साधू साध्वी आहेत.शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता प्रवचन सोहळा आष्टी येथील पंडीत जवाहर नेहरू विद्यालय येथे सुरू होईल.दुपारी १ ते ३ दरम्यान सर्व धर्मीयांसाठी दर्शनाचा विशेष सोहळा होईल.इतर विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाईल.रात्री ८ ते ८.३० या वेळेत आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या चरणस्पर्श दर्शन होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या