Ticker

6/recent/ticker-posts

बाल कथाकारांनी ग्रंथोत्सवात जागविल्या संवेदना..!

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बीड कार्यालयाच्या वतीने आयोजित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाईतील नागापूरकर सभागृहात आयोजिलेल्या दोन दिवशीय ग्रंथोत्सव २०२३ मध्ये शुक्रवारी दि.२९ मार्च रोजी शांतीनिकेतन आर्वी (ता.शिरूर- कासार) येथील शाळांतील बालकथाकारांनी कथासिकांना कथाकथनाची मेजवानीच दिली.यात प्रतिक्षा जगताप,(माझा शेतकरी बाप ) स्नेहल व्हावळे ,(हरवलेले बाबा ) साक्षी गायकवाड,(पारध्याची छबी ) गायत्री सवंडकर (स्वप्नातले आईबाबा )आणि सौताड्याच्या जागतिक विक्रम करणाऱ्या चि.आराध्या नागरगोजे (तरुण बांधवानो )या सर्वांनी आपल्या कथाकथनातून रसिकांना हसवत हसवत रडवले.प्रत्येकाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कथाकथन करुन रसिक श्रोत्यांच्या र्‍हदयाला हात घालत संवेदना जागविल्या. ज्येष्ठ कथाकार डॉ भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली बालकांचे कथाकथन,हा ग्रंथोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पहिले सत्र झाले.यात कथा प्रभावीपणे सादर केल्या.वडील,आई. कुटुंब. मैत्रीण. पाळीवप्रनी. निसर्ग. शेती. शेतकरी.आत्महत्या असे ग्रामीण जीवनालील वास्तव विषय या कथाकारांनी निवडून कथा सांगितल्या. आई,वडील नसलेल्या कथाकारानी श्रोत्यांच्या डोळे अनेकदा पाणावले. जीवनाला उभारी कशी दिली हे सांगितले सांगितले.सर्व बालकानी कथाकथनात भाग घेवून चुणूक दाखविली.या सहभागींना प्रमाणपत्र देवून कौतुक करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय समारोपात आजच्याकथाकथनात सहभागी झालेल्या बाल कथाकारांनी केलेल्या धाडसाचे कोैतुक करुन,विद्यार्थ्यांनी अभ्यासाशिवाय अवांतर वाचन करावे,लिहिण्याचे धाडस करावे, शाळांच्या ग्रंथालयांनी,बाल वाचकांसाठी ग्रंथालय खुले करुन द्यावे,त्यामुळे आजचे बालवाचक उद्याचे नामांकित साहित्यिक होण्यासाठी मदत होईल.,याचे स्वःतचे उदाहरण डॉ. भास्कर बडे यांनी देवून आवाहन केले. माझ्या घरी वाचनाचा परंपरा नसताना, शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तके वाचण्यासाठी मिळवण्यासाठी दहावीत बंड केले नसते तर साहित्यिक घडलो नसतो असे स्पष्ट केले.ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने आयोजिलेल्या या बालकांच्या कथाकथन सत्राबद्दल अभिनंदन केले.याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के,ग्रंथालय निरीक्षक पुरूषोत्तम राऊत ,मसाप चे सचिव अंबाजोगाई यांच्यासह अनेक ग्रंथालय कर्मचारी,ग्रंथालय चालक व ग्रंथप्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या