(

आष्टी (प्रतिनिधी)
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचा मराठवाडा संवाद दौरा आणि
प्रदेश कार्यकारिणीची बैठक जालना शहरातील भाग्यनगर परिसरातील मराठा सेवासंघ
कार्यालयातील भाऊसाहेब देशमुख सभागृहात शुक्रवारी दि २९ मार्च रोजी पार पडला.या
बैठकीत महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडची जालना येथे मराठवाडा विभागीय संवाद दौरा व बैठक
झाली.या बैठकीत महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शिवमती
सौ.सुवर्णाताई बाळासाहेब गिऱ्हे यांची निवड झाली.यावेळी महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड
कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या
प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवमती विभावरीताई
ताकट,प्रदेश कार्यकारणी शिवमती राजश्रीताई शितोळे,प्रदेश उपाध्यक्ष -वर्षीताई माने,
कालिंदीताई ठुबे पाटील, प्रसिद्धी प्रमुख वैशालीताई कडूस, प्रवक्ता रेखाताई
सूर्यवंशी, प्रदेश संघटिका बोराडे ताई,वंदनाताई आखरे, लताताई बावणे यांची प्रमुख
उपस्थिती होती. सुवर्णा ताई गि-हे यांनी अल्पावधित तालुकाध्यक्षपदाची धुरा
प्रभावीपणे व यशस्वीरित्या सांभाळली त्यांच्या या कामाची दखल घेऊन कार्यकारिणीने
सुवर्णाताई गि-हे यांची जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली.सुवर्णाताई
यांनी झुंजारनेताशी बोलतांना सांगितले की,बीड जिल्यातील सर्व तालुक्यात जिजाऊ
ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नेमून कार्यकारणी करण्यात येईल. पूर्ण ताकतीने जिजाऊ
ब्रिगेडचे काम केले जाईल जिजाऊ ब्रिगेड ही एक सामाजिक संघटना आहे महिलांचा
सर्वांगीन विकास करणे,महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे,महिलांना अंधश्रद्धा कालबाह्य
रूढी परंपरा महिला यातून बाहेर काढणे आणि समाजहिताचे कामे करणे हे प्रमुख जिजाऊ
ब्रिगेडचे उद्दिष्ट आहेत.माझ्यावर जी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.ती जबाबदारी
यशस्वीपणे पार पाडली जाईल असे शिवमती सुवर्णाताई गि-हे म्हणाल्या.
0 टिप्पण्या