आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक संस्थेच्या मोतीलाल कोठारी विद्यालयातील १९८७ वर्षाच्या विद्यार्थीचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. सन १९८७ च्या इयत्ता १० चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.
स्नेहमेळाव्यात अनेकांचे भाषणे झाली.३६ वर्षानंतर विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.गुरु व विद्यार्थ्यांंना आपला सेवाकाळ आठवला.
विद्यार्थ्यांना आपलं बालपण आठवल्यने मन हेलावून गेले.
विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वर्षानंतर भेटण्याचा आनंद,शब्दांना वाट मोकळी करता आली.
स्नेहमेळाव्याचा योग वर्षातून एकदा का होईना यावा अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली. यावेळी दोस्ताना चित्रपटातील
ओ खाबो के दिन,
ओ..किताबो के दिन,
सवालों की राते,
जवाबो के दिन,
कई साल हमने गुजारे यहा,
यही साथ खेले,हुए हम जवा,
था बचपन बडा आशिकाना हमारा.
या गीतांची आठवण माजी विद्यार्थी या नात्याने करून गेले.
आठवणीनी सर्व विद्यार्थी,
मित्र,भारावुन गेले होते.कडा येथील मोतीलाल कोठारी शाळेच्या सन १९८७ सालच्या १० वी.बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळावा आणि स्नेहमिलन झाले.तब्बल ३६ वर्षाने विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते.सन १९८७ च्या.दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन पार पडले.आपण दरवर्षी क्लासमेंटांचे गेट टुगेदर करुया असे यावेळी जाहिर केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी जे आपल्या ग्रुपमध्ये होते.ज्यांचे निधन झाले आहे.या मित्र मैत्रीणांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या १९८७ बॅचने दर वर्षीप्रमाणे गेट टूगेदरचे आयोजन केले होते.यावर्षी सुजलग्राम,मुळा धरण,अहमदनगर येथे आयोजित केले होते.एकूण ४८ माजी विद्यार्थी हजर होते.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणाहून सदस्य हजर होते.आज सर्व जण ५२ वयाचे मित्र मैत्रिणी देहभान विसरून नाचले व एन्जॉय केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब महाडिक सर यांनी केले.कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून या ग्रुपच्या ॲडमीन सुहासिनी नवघन यांनी मनोगत व्यक्त केले.
संगीता घोगरे,कैलास झेंडे,संगीता जाधव,चित्रा कोंडेजकर,गौतम खंडागळे,वैशाली देशपांडे,अशोक गरुड,प्रतिमा जैन,नंदकुमार उगले,आदी सर्वांनी आपल्या विविध कला सादर करून सर्वांचे मनोरंजन केले.या गेट टूगेदरला अमोलक संस्थेच्यावतीने प्रा.डॉ. राधाकृष्ण जोशी,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर हजर होते.त्यांनी आपल्या मनोगतात मैत्री ग्रुपचे अभिनंदन करून,आपला सर्व ग्रुप श्री अमोलक परिवार माजी विद्यार्थी ग्रुपवर सामील करावा. आपल्या परिचित सर्वाना या ग्रुपवर सामील करावे असे आवाहन केले.यावर्षी लग्नाच्या तिथी असल्याने संख्या थोडी कमी झाली पण पुढील वर्षी मोठया संखेने याचे आयोजन करण्यात येईल असे दिनेश पारेख,
डॉ.बाळासाहेब धाडगे,किशोर पोखरणा,रविंद्र चंगेडिया,शारदा नाथ,यांनी मत व्यक्त केले.या नियोजनसाठी विकास धर्माधिकारी,सुनील कटारिया,

बाबासाहेब फिस्के,विजयकुमार गिऱ्हे यांनी परिश्रम घेतले.पुढीलवर्षी सर्व जण मोठ्या संख्येने एकत्रीत येऊ असे ठरले.
उपस्थितांचे आभार विकास धर्माधिकारी यांनी मानले.
0 टिप्पण्या