








आष्टीतील कृषी प्रदर्शनाला शेतीतज्ञसह शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्तम
बोडखे,आष्टी.
--------------
राज्यातील शेती क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या आणि
त्यातून प्रगतीचा मार्ग सुकर करणाऱ्या शेतीनिष्ठ शेतकऱ्यांसाठी राज्यपातळीवरील कृषी
प्रदर्शन माजी आ.भीमराव धोंडे यांनी आयोजित केले आले.आष्टीचे माजी आ.भीमराव धोंडे
यांंच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाचे आयोजन विविध शेती तज्ञांच्या कल्पकतेतून भरले
आहे.या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.कृषी
प्रगतीला महामंत्र देणारे प्रदर्शन म्हणूनही या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाकडे
पाहीले जात आहे.आधुनिक पद्धतीने शेती करूनच शेतीचा विकास होऊ शकेल असा विश्वास
खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे
म्हणाले की,दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी आधुनिक शेती करणे गरजेचे आहे.कृषी
साहित्य दर वाढलेले आहेत आणि शेतीमालाचे दर घसरले असे चित्र आहे.या अडचणीवर मात
करण्यासाठी आधुनिक शेतीची गरज असल्याचे माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले. आष्टी येथील
छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्यावतीने चार दिवसीय डॉ. स्वामिनाथन
राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन आष्टी येथे करण्यात आले आहे.दि.२४ ते २७
डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे
यांच्या हस्ते झाले रविवारी झाले.प्रमुख पाहुणे म्हणुन त्या बोलत
होत्या.खा.डाॕ.प्रितमताई मुंडे पुढे म्हणाल्या की,विद्यार्थ्यांना शालेय
शिक्षणाद्वारे शेतीचे महत्व समजले तर ते आधुनिक शेतीकडे वळतील.शेतीतून विकास करायचा
असेल तर आधुनिक शेतीने पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.राज्य
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की शेतीतून स्वयंपूर्ण व्हायचे असेल
तर आयातीवरील भार कमी केला पाहिजे.जागतिक तापमान वाढीमुळे हवामान बदल होत
आहे.त्यामुळे अवकाळी पावसासारखे प्रश्न निर्माण होऊन शेतीवर परिणाम होतो.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार
घेण्याची गरज आहे.आधुनिक पद्धतीने शेती करणारा शेतकरीच स्पर्धेमध्ये टिकू
शकतो.बांबू लागवडीसारख्या नवीन प्रयोगाला सरकार हेक्टरी ७ लाख रुपये पर्यंत अनुदान
देते.शेतकऱ्यांनी अशा योजनांचा उपयोग केला पाहिजे.आ.सुरेश धस म्हणाले की,भीमराव
धोंडे यांना शेतीची अवड आहे.त्यामुळे ड्रॅगन फ्रूट उत्पादन त्यांनीच तालुक्यात
सर्वप्रथम सुरू केले.तालुक्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ही आता
त्यांनीच भरवले आहे.शेतीमध्ये सर्वाधिक समस्या मजुरांची कमतरता ही आहे.पूर्वी मजूर
मालकाकडे काम मागण्यासाठी येत.आता मालकांनाच मजुरांच्या घरी जाऊन कामाला येण्यासाठी
मनधरणी करण्याची वेळ आली आहे.शहरांमध्ये धाव घेणाऱ्या तरुणांनी गावामध्येच शेतीकडे
लक्ष दिले तर त्यांना दुसऱ्याच्या कंपन्यांमध्ये राबण्याची गरज पडणार नाही.सर्व
शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे.राज्य सरकारने दुधाला पाच
रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.केंद्र सरकारने देखील दूध पावडरला प्रति किलो
५० रुपये याप्रमाणे अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे
केली.यावेळी आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की, पूर्वी नाशिक,पुणे,बारामती अशा ठिकाणी
आधुनिक शेतीची माहिती घेण्यासाठी जावे लागत होते.भीमराव धोंडे यांनी आष्टी
तालुक्यात हे कृषी प्रदर्शन भरून शेतकऱ्यांची मोठी सोय केली आहे. सध्याची शेती ही
आधुनिक पद्धतीने करण्याची शेती असून या प्रकारचे प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयोगी
ठरते.पूर्वी पाठीवर ओझे घेऊन शेतात फवारणी करावी लागत असे.आता आधुनिक पद्धतीच्या
यंत्रामुळे हे काम जास्त सोपे झाले आहे.शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनातून अशा गोष्टी
शिकून घेतल्या पाहिजे. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले
की,नैसर्गिक स्त्रोतांचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.भारत देश अन्नधान्य
उत्पन्नात स्वयंपूर्ण झाला असला तरी मागील काही वर्षापासून धान्य उत्पादनात स्थिरता
आली आहे. भविष्यकाळात जमिनीचे आरोग्य, सुपीकता आणि उत्पादनक्षमता वाढविण्याच्या
दृष्टिकोनातून योग्य ती पावले वेळीच उचलणे गरजेचे आहे.शेतीच्या दृष्टीने पाणी आणि
जमीन हे महत्वाचे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे.याचा वापर काळजीपूर्वक करणे प्रत्येकाची
जबाबदारी आहे.मातीचे आरोग्य अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून मृदाशास्त्रज्ञांनी
संशोधनात भर द्यावा,शेतीत अधिकाधिक उत्पादनापेक्षा शाश्वत उत्पादन आपले लक्ष असले
पाहिजे असे आवाहन करीत शेतीत उत्पादन हाच प्रमुख घटक नसून शेतकरी ही तेवढाच
महत्त्वाचा आहे.त्यामुळे कृषी मंत्रालयाचे नामकरण आता कृषी व किसान कल्याण मंत्रालय
असे झाले आहे,केमिकल लेस शेती करणे लगेच शक्य नाही,मात्र लेस केमिकल शेतीचा प्रयोग
सुरू केला तर हळूहळू संपूर्ण शेती रसायन मुक्त होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत यासाठी त्यांना काय आवश्यक आहे
याची माहिती घेण्यासाठी आता महिन्यातून एकदा विद्यापीठातील शास्त्रज्ञ
शेतकऱ्यांच्या बांधावर जातात त्यांच्या शेतीमधील अडचणी जाणून घेतात आणि त्यानुसार
त्यावर काय मात करता येईल असे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे
सांगितले. या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे संयोजक माजी आ.भीमराव धोंडे म्हणले
की,दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी आधुनिक शेती करणे गरजेचे आहे.कृषी साहित्य
दर वाढलेले आहेत आणि शेतीमालाचे दर घसरले असे चित्र आहे.या अडचणीवर मात करण्यासाठी
आधुनिक शेतीची गरज आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार पीक उत्पादन वाढले पाहिजे याकडे भर
देण्यास त्यांनी लक्ष वेधले.यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र
मस्के,अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे, वाल्मिकतात्या निकाळजे,तालुकाध्यक्ष
ॲड.साहेबराव म्हस्के,समाजसेवक विजय गोल्हार,कृषी सहसंचालक डॉ.तुकाराम मोटे,उपविभागीय अधिकारी
प्रमोद कुदळे,तहसीलदार प्रमोद गायकवाड,कृषी अधिकारी गोरख तरटे,बाबासाहेब
पिसोरे,गो.गो.मिसाळ,सभापती रमजान तांबोळी,उपसभापती नामदेव धोंडे, बबनआण्णा
झांबरे,बापुराव धोंडे,राजेंद्र धोंडे,सरपंच सावता ससाणे,बाळसाहेब भुकन,अशोक
साळवे,ॲड.रत्नदीप निकाळजे परमेश्वरकाका शेळके,ह.भ.प.दिनकरराव तांदळे, अशोक
मुळे,सुनिल रेडेकर,भाऊसाहेब लटपटे,मधुकर गर्जे,रामराव खेडकर,सतीशमामा झगडे,राजेंद्र
वनवे (पनवेल),रामदास बडे,अनिलतात्या ढोबळे,बाबुशेठ भंडारी,किशोर खोले,पांडुरंग
नागरगोजे,नवनाथ सानप,यशवंत खंडागळे,कवी सय्यद आल्लाउद्दीन नगरसेवक ज्ञानदेव राऊत
,बाळासाहेब शिंदे,नामदेव राऊत,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,प्राचार्य
डाॕ.दत्तात्रय वाघ,विक्रम पोकळे,हरिभाऊ जंजीरे,उत्तम बोडखे,बाबु कदम,सुभाष
राऊत,बाळासाहेब देशमुख,पांडुरंग गावडे,संजय धायगुडे,हरिभाऊ
तांदळे,बन्सीभाऊपोकळे,बबनराव औटे,विष्णूपंत वायभासे,रावसाहेब लोखंडे,सुदामकाका
झिंजुर्के,दिलीप म्हस्के फौजी,सेवानिवृत्त नायब तहसिलदार शहादेव गिते,शंकर
देशमुख,ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार
युवानेते डाॕ.अजयदादा धोंडे यांनी मानले.
चौकट
---------
माजी आ.धोंडे यांचे
उत्कृष्ट नियोजन आष्टी तालुक्यात कृषी वातावरण!
-------------------------
गेल्या
अनेक दिवसापासून सातत्याने आष्टी शहरात राज्यस्तरीय कृषी अधिवेशनाची तयारी आष्टी
पाटोदा शिरूरचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतीनिष्ठ शेतकरी सह
विविध कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केली.आज झालेल्या या कृषी
प्रदर्शनावेळी याचा प्रत्यय आला.विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त
करत या प्रदर्शनाचा लाभ घेतला.या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना उत्स्फूर्त आत्मविश्वास
येऊन नवीन प्रयोग करण्याची मनामध्ये ऊर्जा येईल असा विश्वास माजी आ.भीमराव धोंडे
यांनी व्यक्त केला.
चौकट
--------
या प्रदर्शनीमध्ये फळबाग,
भाजीपाला,फुलशेती,वनौषधी,कापुस,ज्वारी, गहू,कडधान्य तेलबिया,
पाणलोटविकास,ऊस,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय,कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी
विभागांसोबतच छञपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात
आले.शेतकरी बंधूचे ग्रामीण विकासासंबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक
जोडधंदे,कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य
आकर्षण ठरले.खाऊगल्लीत आ.सुरेश धस,राजेंद्र धोंडे,सभापती रमजान तांबोळी, बापुराव
धोंडे ॲड.साहेबराव म्हस्के,बाबुशेठ भंडारी,अनिलतात्या ढोबळे,उत्तम बोडखे,यशवंत
खंडागळे प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांनी खाऊ खाऊन
आनंद घेतला.
***************************
0 टिप्पण्या