Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथील आनंदराव धोंडे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे अभय धोंडे यांंच्या हस्ते उद्घाटन

आष्टी (प्रतिनिधी ) आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आष्टी तालुक्यातील कडा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे अभयराजे धोंडे यांंच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट व विद्यापरिषद सदस्य तथा प्राचार्य डॉ.हरिदास विधाते हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डॉ.संजय दरवडे,प्रा.डॉ.अनिल गर्जे,प्रा.डॉ‌.अभय शिंदे,पत्रकार बा.म.पवार आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी सांगितले की,२०१० पासुन ही स्पर्धा अविरत सुरू आहे.भविष्यात देखील सुरुच राहणार आहे.अशा स्पर्धामधून परिपुर्ण असे विद्यार्थी घडले जातात.वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच इतर कलागुणांना वाव मिळतो.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण यांनी सांगितले की,स्व.आनंदराव धोंडे हे अत्यंत दुरदृष्टीचे व्यक्तीमत्व होते.त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांची सेवा केली.गेल्या १२ वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे.राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात.स्पर्धेचे परीक्षक व भेंडा येथील प्रा.डॉ.संजय दरवडे यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांनी सतत वाचन, लेखन व मनन करावे म्हणजे ज्ञान वाढते. याप्रसंगी प्रा.डॉ.संभाजी ओव्हाळ व इतरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.पी.बोडखे यांनी केले आहे.कोल्हापूर,पुणे,नवी मुंबई,औरंगाबाद, लातूर,
बीड,माजलगाव व इतर ठिकाणच्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला‌.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या