आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील सामाजिक कार्यकर्त्यां सौ.प्रतिभाताई सोपानराव जोगदंड यांच्या मातोश्री ह.भ.प.पार्वतीबाई लक्ष्मणराव ताकतोडे (वय ८५)(रा.साळेगाव)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यापाठीमागे ज्ञानदेव लक्ष्मणराव ताकतोडे,शिवाजी लक्ष्मणराव ताकतोडे हे दोन मुले आणि सौ.प्रतिभाताई सोपानराव जोगदंड,
पद्मीन ससाणे,राजाबाई लोखंडे या तीन मुली ,
सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.पार्वतीबाई ताकतोडे यांनी आयुष्यभर पतीची सेवा केली.दत्तभक्ती केली.भगवान दत्ताची सेवा केली.घराच्या दारातच दत्तमंदिर असल्याने सकाळ संध्याकाळ आरती (पुजा आर्चा केल्याशिवाय जेवन केले नाही.५० वर्षापासून गुरुवार व एकादशी उपवास केला. गेल्या कार्तीक एकादशीपासुन पार्वतीबाई अंथरुणावर पडून असताना फक्त चमचाभर भगरीचा भात खावून एकादश केली पण उपवासात खंड पडु दिला नाही. त्यांनी लिंग धारण केले होते.लिंग पुजा नित्यनियमाने करीत होत्या,त्यांच्या अत्यविधीला गांवातील शेकडो लोक उपस्थित होते.टाळमृदंगाच्या गजरात वाजत गाजत स्मशानापर्यत नेण्यात आले.तेथे जंगम याने विधीवत पुजा आरती पूर्ण संस्कार करून मीठामध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला.
0 टिप्पण्या