Ticker

6/recent/ticker-posts

केळसांगवी येथील नदीपात्रात पडलेल्या राजेंद्र पवळ या तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

आष्टी (प्रतिनिधी) अचानक चक्कर येऊन पुलावरून नदीपात्रात पडलेल्या राजेंद्र पवळ या ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह २६ तासानंतर पुणे येथील नेव्हीच्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले. आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील राजेंद्र बापुराव पवळ हा ४० वर्षीय तरूण रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान गावालगत असलेल्या पुलावरून घराकडे येत होता. पुलावर येताच त्याचा अचानक तोल जाऊन नदीमध्ये कोसळला..आणि बुडाला तो वर आलाच नाही..आजूबाजूच्या काही तरुणांनी पाण्यात बुड्या घेऊन त्याला शोधण्यात यश आले नाही सोमवारीही दिवसभर शोध मोहीम सुरू होती..गळ,ट्युब वापरत पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांनी शोध घेतला. बीड नगरपरिषेदेच्या कर्मचाऱ्यांनीदेखील शोध घेतला पण तरूण मिळून आला नाही.अखेर नेव्हीमधील दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असतं तब्बल २६ तासानंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या