Ticker

6/recent/ticker-posts

खडकतचे ह.भ.प.भीमराव गायकवाड महाराज यांची अ.भा.वारकरी मंडळाच्या नगर जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड

आष्टी (प्रतिनिधी) अ.भा.वारकरी मंडळ अहमदनगर जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी खडकत- सितपूरचे ह.भ.प.भीमराव जगन्नाथ गायकवाड महाराज यांची निवड झाली. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले डिकसळकर, यांनी नाशिक विभागीय अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज बोगीर व राज्याचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प अनिल महाराज वाळवे यांच्या शिफारशीनुसार ह.भ.प.भीमराव गायकवाड यांची निवड केली आहे. नारायणगडाचे माणिक बाबा यांचे वंशज असणारे ह.भ.प भीमराव महाराज गायकवाड हे वै. जगन्नाथ महाराज गायकवाड यांचे चिरंजीव आहेत.वै.जगन्नाथ गायकवाड व परिवाराचे शितपूर व कर्जत जामखेड,आष्टी तालुक्यात आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.ह.भ.प.गायकवाड परिवाराच्यावतीने प्रत्येक वर्षी शितपूर येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात महायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. नाथषष्ठीच्यानिमित्ताने शितपूर ते पैठण पायी दिंडीची परंपरा गायकवाड परिवाराने जोपासली आहे.त्यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य सर्वश्रुत आहे.ह.भ.प.भीमराव गायकवाड महाराज यांच्या निवडिने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ह.भ.प.गायकवाड महाराज यांचे आ. बाळासाहेब आजबे , आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे , माजी आ.साहेबराव दरेकर,अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले,अ.भा.वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव तांदळे महाराज
,पत्रकार उत्तम बोडखे यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या