Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.आशा फड यांच्या शिक्षण व लेखणीचा सन्मान

आष्टी (प्रतिनिधी) मातृभूमी प्रतिष्ठान बीड संचलित अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी समाज वधू वर नोंदणी महासंघ तथा वंजारी विश्व वधू वर मंडळ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभात हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध लेखिका प्रा.आशा फड यांचा सत्कार या मंचावर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र,पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन परिवारासह नुकताच बीड येथे करण्यात आला.प्रा.आशा फड यांनी सर्वसामान्य परिस्थितीत उच्च शिक्षणाचा उच्चांक साधला आहे.एम.ए.हिंदी,बी.एड,एम.फिल.,सेट आदी पीएच.डी.तसेच 'जोहरा- एक मूल्यांकन' ही पूजा प्रकाशन कानपूरच्या माध्यमातून लोकप्रिय कादंबरी लिहीली आहे.या त्यांच्या हिंदी साहित्य क्षेत्रातील पुस्तकास नुकताच राजस्थान येथील संगम अकादमीचा 'संगम साहित्य सेवा सन्मान पुरस्कार- २०२३' प्रदान करण्यात आला आहे.या उत्कृष्ट लेखणीची दखल घेत आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याची नोंद घेऊन मातृभूमी प्रतिष्ठान,बीड यांच्यावतीने त्यांचा या पवित्र मंचावर संत मीराबाई संस्थान च्या मठाधिपती महंत ह.भ.प.राधाताई महाराज (आईसाहेब),ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे,जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख,उद्योजक उत्तमराव मिसाळ, रामदास हंगे,गो.गो.मिसाळ,मोहनराव शिरसाठ,ह.भ.प.संजय महाराज गीते यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.संजय तांदळे,ज्ञानोबा मुंडे,विलास अण्णा जायभाये,गणेश सानप,फौजदार विजय जाधवर,पत्रकार नागरे नाना,ज्ञानोबा वायबसे,बाळासाहेब नागरगोजे,लक्ष्मण चाटे,सतीश जायभाये,पांडुरंग जायभाये, विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला भगिनी,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या