आष्टी (प्रतिनिधी)
आष्टीचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे महेश आयुर्वेद महाविद्यालयास शासनाची मान्यता मिळाली
आहे.आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर
होण्याची सुवर्णसंधी आष्टी येथे माजी आ.भीमराव धोंडे यांनी उपलब्ध करून दिली
आहे.आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुलात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
कृषी,अन्नतंत्र,फार्मसी, पॅरामेडीकल,कृषीतंत्र,इंजिनिअरिंग,नर्सिंग शिक्षणाबरोबर
आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सोय झाली आहे. शेतकरी
शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित महेश आयुर्वेद महाविद्यालयास एनसीआयएसएम नवी
दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांची मान्यता व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
नाशिक यांचे संलग्निकरण प्राप्त झाले आहे आष्टी संलग्निकरण प्राप्त झाले आहे आष्टी
तालुक्यातील पहिले व एकमेव आयुर्वेद महाविद्यालयास आनंद शैक्षणिक संकुलात परवानगी
मिळाली आहे.त्यामुळे आष्टी-पाटोदा-शिरुर,बीड,अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील
मुलांचे बीएएमएस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सन २०२३ -२०२४ साठी प्रवेश सुरू
झाली आहे.कॉलेजचा चॉईस कोड १२४११६ हा आहे.ज्या विद्यार्थ्यांना बीएएमएस
आयुर्वेद महाविद्यालयास प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष
कॉलेजला भेट द्यावी किंवा खालील नंबरवर संपर्क साधावा मोबाईल नंबर 8149295156,
9422352261,9423471395 या नंबरवर संपर्क करावा.
0 टिप्पण्या