बीड (प्रतिनिधी )
लहानपणीच्या सुंदर संस्काराने माणूस घडत असतो असे म्हणतात.पैशापेक्षा निर्मितीमधील आनंद जास्त असतो.एकूणच,ध्येय गाठण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्नांची गरज असते. या तज्ञांच्या महत्त्वपूर्ण वचनांमुळे भविष्यातील पिढी घडत असते.हाच आदर्श घेऊन मराठी वाङ्मय विषयाचे शिक्षक अरुण घोळवे यांच्या अथक परिश्रमातुन विद्यार्थ्यांच्या अक्षरांचे सुवर्णमती बनले आहेत.
अक्षर हा मनुष्याचा दागिना असतो.सुंदर अक्षरातून सुंदर रचनांची निर्मिती होते.हेच लक्षात घेत अरुण घोळवे सरांनी विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्याचा परिणाम म्हणून बहुतेक अक्षरांचे सुंदर अक्षरात रूपांतर झाले.कु.सिद्धी बिभिषण चाटे या नववीच्या विद्यार्थिनीने याच सुंदर अक्षरातून राज्य,विभाग आणि जिल्हा पातळीवरील अनेक पुरस्कार सन्मान आणि पारितोषिके मिळवले आहेत.
कु.सिद्धी चाटे यांनी लिहिलेल्या सुंदर अक्षररांची पाहणी बीड मधील जेष्ठ शिक्षक गुरुवर्य गणित तज्ञ विठ्ठल जायभाये यांनी केली.अक्षर पाहून त्यांनी कु.सिद्धीचे कौतुक केले.यावेळी त्यांच्या समवेत नॉलेज प्लांट च्या संचालिका सौ.गीतांजली जायभाये उपस्थित होत्या.दरम्यान, या हस्ताक्षराचे श्रेय कु.सिद्धीने राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संदीप पवार,मराठी वाङ्मयाचे अध्यापक अरुण घोळवे व वडील प्रा.बिभिषण चाटे,आई प्रा.आशा चाटे यांना दिले आहे.
-----------------------
0 टिप्पण्या