Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथे पांढरीकरांच्या सप्ताहात ह.भ.प.गणेश महाराज ढगे यांंचे आज काल्याचे कीर्तन तर जालींदर भोगाडे यांची काल्याची महापंगत.

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पांढरी येथील हनुमान मंदीर ट्रस्ट आणि संपुर्ण गावकरी वारक-यांच्यावतीने साधु संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमीत्त पंचंदिनी हरिनाम सप्ताह जगद्गुरू तुकाराम महाराज चरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.हा सप्ताह दि.२० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होत आहे.पंढरपूर येथे पांढरीकरांच्या सप्ताहात ह.भ.प.गणेश महाराज ढगे यांंचे आज काल्याचे कीर्तन जालींदर भोगाडे यांची काल्याची महापंगत होणार आहे.भावीक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. धोंडीबापु वांढरे महाराज यांनी केलेले आहे.ह.भ. प.गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत (बाबा) (आळंदी देवाची) आणि ह.भ.प.गुरुवर्य रघुनाथ महाराज चौधरी धामणगांवकर यांचे आशिर्वादाने आणि ह.भ.प.प्रशांत महाराज भोगाडे पांढरीकर यांचे मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित केला आहे.यंदाचे दुसरे वर्ष आहे. सप्ताहात दैनिक कार्यक्रम काकडा भजन,विष्णु सहस्त्रनाम, विठोबा-रखुमाई नामजप,सकाळी ९ ते ११ हरिकिर्तन,दुपारी ३ ते ४ तुकाराम महाराज चरित्र,हरिपाठ,जागर होईल.या सप्ताहात संत तुकाराम महाराज चरित्र कथा ह.भ.प. प्रशांत महाराज भोगाडे यांंची दुपारी ३ ते ४ या वेळात होणार आहे.सोमवार दि,२० नोव्हेंबर रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज फुके (पंढरपुर) यांचे सकाळी ९ ते ११ तर मंगळवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते११ यावेळात ह.भ.प.माऊली महाराज गव्हाड (पंढरपुर) आणि बुधवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळात ह.भ.प.तुषार महाराज खताळे (आळंदी देवाची) आणि गुरुवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळात ह.भ.प.कैलास महाराज भोरे आणि गुरुवारी सायंकाळी ६ ते ८ यावेळात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (गौसेवक) यांचे हरिकीर्तन झाले आहे.आज शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळात ह.भ.प.गणेश महाराज ढगे पंंढरपूर यांंचे काल्याचे कीर्तन होणार आहे.जालींदर गणपत भोगाडे यांची काल्याचे महाप्रसादाची महापंगत होणार आहे. सप्ताहात काकडा ह.भ.प. काशिनाथ शेंबडे,बापु शिंदे,सखाराम आजबे, धोंडिबापू वांढरे महाराज, चंद्रकांत वांढरे,बापू रखमाजी वांढरे,डोके (पोस्टमन) तर सप्ताहात मृदंगाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर कसरे,पुरुषोत्तम भोगाडे,माऊली वांढरे,सोपान भोगाडे,शिवम वांढरे हे मृदंगवादन करणार आहेत.या कार्तीक वारीनिमित्त आयोजित सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. धोंडीबापु वांढरे महाराज यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या